नेपाळचा मोठा कुचरपणा, तरीही भारत धावला मदतीला, थेट मदत, तब्बल 35 कोटी..

नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह मागील काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेताना दिसले. तरीही भारताने साथ सोडली नाही. भारत आता नेपाळच्या मदतीला धावू आला. भारताने अत्यंत मोठी मदत नेपाळला केली.

नेपाळचा मोठा कुचरपणा, तरीही भारत धावला मदतीला, थेट मदत, तब्बल 35 कोटी..
Prime Minister of Nepal
| Updated on: May 30, 2026 | 12:20 PM

नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह भारताविरोधात निर्णय घेताना दिसत आहेत. नेपाळ सरकारने उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन नियम बनवला, ज्याच्या माध्यमातून भारताला दणका देण्याचे काम करण्यात आले. मात्र, तो निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला. सरकारने नवीन कस्टम नियम बनवला होता. नेपाळचा कुठला माणूस भारतातून 100 नेपाळी रुपयापेक्षा जास्त किंमतीचे सामान विकत घेऊन येत असेल तर त्याला कस्टम ड्युटी द्यावी लागणार होती. एका मागून एक नेपाळ सरकार भारताविरोधात निर्णय घेताना दिसले. नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध जुने आणि फार महत्वपूर्ण आहेत. नेपाळच्या मदतीला कायमच भारत धावला आहे. नेपाळ सरकार भारताच्या विरोधात निर्णय घेत असतानाच भारत पुन्हा एकदा नेपाळच्या मदतीला धावला आहे. नेपाळला भारताने तब्बल 35 कोटींची मदत केली.

नेपाळमधील भूकंपग्रस्त 8 जिल्ह्यांमधील शाळांची पुनर्बांधणी करण्याकरिता भारताने नेपाळी रूपयांप्रमाणे 56 कोटी 2 लाख (भारतीय रूपये 35 कोटी) मदत केली. भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले की, भारत नेपाळला किती जवळचा मानतो. नेपाळच्या शिक्षण आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या सेंट्रल लेव्हल प्रोजेक्ट इम्लिमेंटेशन युनिट एज्युकेशन या शाळांच्या बांधकामासाठी करारवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात.

भारताने नेपाळला मोठे अनुदान दिले. काठमांडूतील भारतीय दूतावासाने याबाबतचे एक प्रसिद्धी पत्रक काढले. ज्यात याबाबत माहिती देण्यात आली. हजारो नेपाळी विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षा भारत उपलब्ध करू देणार आहे. भारताने नेपाळला केलेल्या या मदतीने दोन्ही देशातील संबंध अधिक चांगले होण्याची शक्यता आहे.

भारताच्या शेजारी देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी अस्थितरता बघायला मिळत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत भारताचे संबंध तणावात आहेत. नेपाळला भारताने आणि भारताने नेपाळला कायमच साथ दिली. काही दिवसांपूर्वी संबंध नक्की थोड्या प्रमाणात ताणले गेले होते. मात्र, आता पुन्हा एकदा नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध सुधारली आहेत. भारताने नेपाळला केलेली ही मदत अत्यंत मोठी आहे. ज्यामुळे नेपाळला मदत होईल.

Follow Us