भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताला झटका, तब्बल 940000 कोटी..

अमेरिका आणि इराण युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच आता भारताला मोठा दणका या युद्धात बसल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताच्या स्वप्नांवर पाणी फिरवण्यात आले. यासोबतच रशियाचेही मोठे नुकसान झाले.

भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताला झटका, तब्बल 940000 कोटी..
America Israel and Iran War
| Updated on: Mar 22, 2026 | 11:54 AM

इराण आणि अमेरिका युद्धाता 20 दिवस होऊ  गेली आहेत. मात्र, तरीही युद्ध थांबत नाहीये. सध्याच्या परिस्थितील युद्ध त्याच्या चाैथ्या टप्प्यात पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. सुरूवातीला जमिनीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर समुद्र, तिसऱ्या टप्प्यात ऊर्जा प्रकल्प आणि आता चाैथ्या टप्प्यात परमाणू ठिकाणांच्या जवळ हल्ले केले जात आहेत. अत्यंत घातक स्थिती हे युद्ध आहे. इराणकडून इस्त्रायलच्या परमाणू शहरावर मोठा हल्ला करण्यात आला. जिथे हा हल्ला झाला तिथून फक्त 13 किलोमीटर दूरवर परमाणू ठिकाण आहे. इस्त्रायलच्या सर्वात सुरक्षित मानले जाणाऱ्या शहरावर हा घातक हल्ला करण्यात आला. या युद्धाचा फटका फक्त तीनच देशांना बसत नाहीये. या युद्धात भारताचे देखील अत्यंत मोठे नुकसान झाले. इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा घातक परिणाम जग भोगत आहे. अमेरिकेने आणि इस्त्रायलने भारताच्या हितसंबंधांवरच मोठा हल्ला चढवला आहे.

अगोदर अमेरिकेने चाबहार बंदरावर मोठा हल्ला केला, तिथेच भारताला मोठा धक्का बसला. हे बंदर भारताकडून विकसित करण्यात आले होते. हे भारताचे मध्य आशियातील प्रवेशद्वार मानले जाते. आता इराणच्या आणखी एका बंदर शहरावर बंदर-ए-अंजलीवर हवाई हल्ला करण्यात आला आहे, ज्यानंतर भारताला मोठा धक्का बसला असून भारताचे थेट नुकसान झाले.

बंदर-ए-अंजली शहर भारत आणि रशिया यांच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरचे (INSTC) केंद्र आहे. इराणमधील बंदर अंजली हे शहर या प्रकल्पातील एक महत्त्वाचा दुवा आहे. त्या शहराच्या अनेक भागांवर हल्ले झाले आहेत. मुळात म्हणजे भारत आणि रशियाचे उद्दिष्ट आहे की, या कॉरिडॉरमार्फत 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवावा. मात्र, आता अमेरिका आणि इस्रायलच्या कारवायांनी भारताच्या योजनांना मोठा धक्का दिला आहे.

भारताचे थेट नुकसान होताना दिसत आहे. दोन्ही शहरांवर हल्ले केले जात आहे. अगोदरच या युद्धामुळे होर्मुज खाडी बंद असल्याने भारताचे मोठे नुकसान होत आहे. भारताच्या 940000 कोटी रुपयांच्या या स्वप्नावर हल्ला केला आहे. फक्त इराण, भारत आणि रशियालाच धक्का बसला नाही तर यासोबतच अनेक देशांनाही या हल्ल्यामुळे मोठा धक्का बसल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us