AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग, पुर्वनियोजित भेट..

राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अचानक सकाळी त्यांचा ताफा वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाला. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजपावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग, पुर्वनियोजित भेट..
Raj Thackeray and Devendra Fadnavis
| Updated on: Aug 12, 2026 | 9:06 AM
Share

प्रतिनिधी विनायक डावरूंग : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता राज ठाकरे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजपावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यांनी राज्यातील बड्या नेत्यांवरही टीका केली. पण आज सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्यापासून सरकार राज ठाकरेंची टीका वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच मेळाव्यात देखील त्यांनी नरेंद्र मोदींंसह अमित शाह यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या जिमखान्याच्या मुद्द्यात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्या कळतंय.

राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक देखील सोबत आहेत. 8 वाजता राज ठाकरे वर्षा बंगल्यावर पोहोचले. अचानकपणे राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. यादरम्यानच मुंबई गोवा महामार्गाची पाहणी राज ठाकरे यांनी केली होती. ते स्वत: या महामार्गाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते.

आता मुंबई गोवा महामार्गावरही ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करू शकतात. जेंनजीच्या आंदोलनातही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताना राज ठाकरे दिसले होते. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मोठ्या उत्साहाचे आयोजन करण्यात आले. नितीन गडकरी यांच्यावरही टीका करताना राज ठाकरे दिसत आहेत. त्यातच ते आता थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून सतत भाजपावर टीका केली जात आहे.

मात्र, त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले नाहीत. राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या जिमखान्याच्या मुद्द्यात राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचे सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर राज ठाकरे नक्की काय भाष्य करतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट पुर्वनियोजित होती. दोन दिवसांपूर्वीच ही भेट ठरली होती. त्यानुसार, आज सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

Follow Us
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्