AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : पत्नीचे आरोपांवर आरोप, लहान हिरोइनसोबत अफेअरच्या चर्चा; गोविंदाकडे किती संपत्ती?

Govinda : 7 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गोविंदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 'रूपा' चित्रपटाची घोषणा करणारा गोविंदा वैयक्तिक आयुष्यामुळेही बराच चर्चेत आहे. पण त्याचं नेटवर्थ किती, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, माहीत आहे का ?

Govinda : पत्नीचे आरोपांवर आरोप, लहान हिरोइनसोबत अफेअरच्या चर्चा; गोविंदाकडे किती संपत्ती?
गोविंदा किती कोटींच्या संपत्तीचा मालक ?
| Updated on: Aug 12, 2026 | 9:03 AM
Share

बॉलिवूडचा ‘हीरो नंबर 1’ म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा, अभिनेता गोविंदा (Govinda)पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याचा आगामी चित्रपट ‘रूपा’ चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात गोविंदांसोबत अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार दिसणार आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या चर्चांनाही पुन्हा हवा मिळाली आहे. गेल्या काही काळापासून गोविंदाचं नावं वैवाहिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता आहुजा हिने गोविदांवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केल्याच्या बातम्या बऱ्याचत काळापासून समोर येत आहेत. एवढंच नव्हे तर त्याच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबतही गोविंदाचं नाव जोडलं जातंय. मात्र यावर त्याने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही की ते आरोप जाहीररित्या फेटाळूनही लावलेले नाहीत, त्यामुळेच या अफवांना आणखी बळ मिळताना दिसतंय. याच विविध आरोपांदरम्यान आणि करिअरच्या पुन्हा नव्या सुरूवातीदरम्यान, गोविंदाचं नेटवर्थ किती, त्याच्याकडे किती संपत्ती आहे ते जाणून घेऊया.

‘रंगीला राजा’नंतर सात वर्षांचा ब्रेक

गोविंदा हाशेवटचा 2019 साली आलेल्या ‘रंगीला राजा’ या चित्रपटात दिसला होता. मात्र त्या चित्रपटाल फारसं यश मिळालं नाही. मेकर्सचेही बरेचसे पैसे बुडाल्याचे समजतं. सलमान खानसोबत पार्टनरमध्ये झळकलेल्या गोविंदाने त्यानंतर कोणताही मोठा , हिट चित्रपट दिला नाहीच. ‘रंगीला राजा’ नंतर चाहत्यांना गोविंदाच्या कमबॅकची प्रतीक्षा होती, मात्र 7 वर्ष तो काही पुन्हा दिसला नाही. आता ‘रूपा’च्या माध्यमातून तो पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

गोविंदा किती कोटींचा मालक ?

रिपोर्ट्सनुसार, गोविंदांची एकूण संपत्ती तब्बल 150 ते 170 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं. सिनेमापासून काही काळ दूर असतानाही ब्रँड एंडोर्समेंट, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आणि इतर माध्यमांतून त्याची कमाई सुरू होती. त्याचं वार्षिक उत्पन्न जवळपास 12 कोटी रुपये असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

मुंबईपासून लखनऊपर्यंत आलिशान मालमत्ता

गोविंदांच्या संपत्तीमध्ये अनेक आलिशान मालमत्तांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. मुंबईतील जुहू परिसरातील त्याचा ‘जय दर्शन’ बंगला विशेष चर्चेत असतो. या बंगल्याची किंमत सुमारे 16 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. याशिवाय रुइया पार्कमध्ये बंगला, मड आयलंडमध्ये घर, कोलकात्यात बंगला आणि लखनऊमध्ये त्याचं फार्महाउस असल्याचेही रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे. मड आयलंडमधील त्याच्या मालमत्तेची किंमत जवळपास 1 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. रुइया पार्कमधील घर भाड्याने दिल्याचीही चर्चा आहे.

कोमल राणी स्वर्णकारसोबत लिंकअपच्या चर्चा !

आता गोविंदाच्या कमबॅकपेक्षा त्याच्या नव्या हिरोईनसोबतच्या कथित लिंकअपच्या चर्चा अधिक रंगताना दिसत आहेत. कोमल राणी स्वर्णकार बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. गोविंदा आणि कोमल राणी यांना एकत्र विमानतळावर स्पॉट करण्यात आल्यानंतर त्या दोघांच्या नावांची चर्चा सोशल मीडियावर वेगाने सुरू झाली. ता हीच अभिनेत्री गोविंदांच्या आगामी ‘रूपा’ चित्रपटात त्याची नायिका असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र, दोघांमध्ये खरंच काही खास नातं आहे की या केवळ अफवा आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?