AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: तयारी सुरु आहे आता…वैभवने पोस्ट करत थेट इशारा दिला, 23 ऑगस्टला मैदानात उतरणार

टीम इंडियाच्या जर्सीमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडल्यानंतर, वैभव सूर्यवंशीचे संपूर्ण लक्ष आता लाल चेंडूच्या क्रिकेटवर आहे. हा 15 वर्षीय युवा खेळाडू 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेपूर्वी, वैभव सूर्यवंशी कसून सराव करत असून, त्याची एक झलक त्याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली आहे.

Vaibhav Sooryavanshi: तयारी सुरु आहे आता...वैभवने पोस्ट करत थेट इशारा दिला, 23 ऑगस्टला मैदानात उतरणार
| Updated on: Aug 12, 2026 | 9:00 AM
Share

टीम इंडियाच्या जर्सीमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडल्यानंतर, वैभव सूर्यवंशीचे संपूर्ण लक्ष आता लाल चेंडूच्या क्रिकेटवर आहे. हा 15 वर्षीय युवा खेळाडू 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेपूर्वी, वैभव सूर्यवंशी कसून सराव करत असून, त्याची एक झलक त्याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली आहे. दुलीप ट्रॉफीसाठी वैभव सूर्यवंशीची पूर्व विभागाच्या संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयानंतर तो चर्चेत आला होता. मात्र, वैभवने आता पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून असे दिसून येते की, त्याला सोपवण्यात आलेली जबाबदरी तो नीट बजावेल.

वैभव सूर्यवंशीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, तो फलंदाजी करताना बचावात्मक तसेच आक्रमक फटक्यांचा सराव करताना दिसत आहे. त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला ‘प्रिपरेश’ असे कॅप्शन दिले. यावरून असे सूचित होते की, वैभव एका नवीन आव्हानासाठी स्वतःला तयार करत आहे. आगामी दुलीप ट्रॉफीसाठी 15 वर्षीय सूर्यवंशीची पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन संघाचे कर्णधारपद भूषवेल. इतक्या लहान वयात नेतृत्व गटात समावेश झाल्यामुळे सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षभरात त्याच्या कारकिर्दीची झालेली जलद वाढ पाहता, त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. पूर्व विभागाचे निवडकर्ते प्रवनजन मल्लिक यांनी स्पष्ट केले की, सूर्यवंशीला तात्काळ कर्णधारपद देण्याऐवजी त्याला मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी हळूहळू तयार केले जात आहे. ते म्हणाले, “त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती झालेली नाही. त्याची केवळ उपकर्णधारपदी नियुक्ती झाली आहे.”

दुलीप ट्रॉफी 23 ऑगस्टपासून सुरू होत आहे. वैभव सूर्यवंशी पहिल्याच दिवशी मैदानात उतरेल, जेव्हा त्याचा संघ उत्तर विभागाविरुद्ध खेळेल. ईशान किशनच्या नेतृत्वाखालील पूर्व विभागाच्या संघात मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू देखील आहेत. या स्पर्धेदरम्यान वैभव सूर्यवंशीला आपले भारतीय क्रिकेटमधील कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

आयपीएल 2026 मध्ये शतक झळकावून ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर, वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाची जर्सी परिधान करायला फार वेळ लागला नाही. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्याने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत पदार्पण करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. या दौऱ्यावर खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली नसली तरी, झिम्बाब्वेमध्ये खेळल्या गेलेल्या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह सर्वाधिक धावा करून तो मालिकावीर म्हणून मायदेशी परतला.

संघ:

इशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, सुदीप घरामी, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, शाहबाज अहमद, सूरज जैस्वाल, विराट सिंग, कुमार कुशाग्रा, शिखर मोहन, सुभ्रांशु सेनापती, अभिजित सरकार, अनुकुल रॉय, दानिश दास.

Follow Us
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..