AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तेच घडतंय, एकाच हल्ल्यात शेकडो लोक ठार, खळबळ उडवणारा इशारा, थेट मध्यरात्रीच…

इराण आणि अमेरिका युद्ध भयंकर स्थितीत आहे. इराणकडून अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. इस्त्रायलचे सर्वात सुरक्षित समजले जाणाऱ्या शहरावर मोठा हल्ला करण्यात आला. चार आठवडे युद्ध चालू शकेल, असा अंदाज सुरूवातीला होता. मात्र, आता स्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. युद्ध इतक्या लवकर संपण्याचे संकेत नाहीत.

ज्याची भीती तेच घडतंय, एकाच हल्ल्यात शेकडो लोक ठार, खळबळ उडवणारा इशारा, थेट मध्यरात्रीच...
Dimona iran attack
| Updated on: Mar 22, 2026 | 10:11 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला 20 दिवस होऊन गेले पण हे युद्ध काही थांबवण्याचे नाव घेत नाही. उलट अधिक घातक होत आहे. इराणकडून मोठा धक्का इस्त्रायलला देण्यात आला. जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून बघितल्या जाणाऱ्या डिमोना या शहरावर मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. हा हल्ला इतका घातक आणि भयंकर होता की, याला रोखणेही इस्त्रायलला कठीण झाले. डिमोना हे इस्त्रायलच्या रेगिस्तानमध्ये बसलेलेल छोटे शहर आहे. शहर छोटे असले तरीही त्याची ओळख जगभरात आहे. येथेच इस्त्रायलचे मोठे परमाणू ठिकाण आहे. इस्त्रायलकडून जगातील सर्वात महागडी आणि आधुनिक हवाई सुरक्षा तैनात केली. एरो सिस्टम आणि आयरन डोम सर्वकाही तिथे आहे आणि जगातील सुरक्षित शहर म्हणून डिमोनाकडे बघितले जाते. असे सांगितले जात होते की, या शहरापर्यंत कोणते मिसाईलही पोहोचू शकत नाही. पण शनिवारी रात्री ज्याचा कोणी विचारही केला नाही असे डिमोना शहरात घडले.

इराणचे मिसाईल थेट डिमोनापर्यंत पोहोचले आणि एकच खळबळ उडाली. आता हे युद्ध चाैथ्या टप्प्यात पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. यावरून कळत आहे की, या युद्धात इराण थकला नाही किंवा हारला नाही तर सतत फक्त लढत राहत आहे. इराणच्या IRGC यांनी एक निवेदन जारी केले. त्यांनी म्हटले की, शनिवारी रात्री उशिरा त्यांच्याकडून इस्त्रायलच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडून भागात हल्ला करण्यात आला.

तीन प्रकारच्या मिसाईलच्या मदतीने त्यांनी हा हल्ला केला. फत्ताह इराणचे हायपरसोनिक मिसाईल आहे, त्याचा वेग कोणीही रूकू शकत नाही. काद्र आणि एमाद हे मिसाईलही इस्त्रायलवर टाकण्यात आली. इराणकडून दावा करण्यात आला आहे की, या हल्ल्यात 200 पेक्षा अधिक इस्त्रायली लोक मारले गेले आहेत. इस्त्रायलकडून इराणच्या या हल्ल्यात आपले 100 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

मात्र, इराणकडून काही वेगळाच दावा करण्यात आला. या हल्ल्यानंतर बोलताना IRGC ने म्हटले की, युद्धाचे समीकरणे अत्यंत लवकर बदलत आहेत. यासोबतच त्यांनी दावा केला की, जगातील सर्वात सुरक्षित मानली जाणारी इस्त्रायलचे हवाई सुरक्षा आता कमकुवत झाली आहे. आता हल्ले रोखण्याची ताकद त्यांच्यात राहिली नाही.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?