AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India New Zealand FTA : चीयर्स! भारत-न्यूझीलंड FTA मध्ये मद्य प्रेमींसाठी खास सरप्राइज, कुठली दारु होणार स्वस्त?

India New Zealand FTA : भारत आणि न्यूझीलंडमध्ये कालच मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. या करारामध्ये मद्य प्रेमींसाठी एक खास सरप्राइज आहे. या FTA मुळे भारतातील अनेक उत्पादनांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत विनाकर प्रवेश मिळेल. त्यामुळे उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल.

India New Zealand FTA : चीयर्स! भारत-न्यूझीलंड FTA मध्ये मद्य प्रेमींसाठी खास सरप्राइज, कुठली दारु होणार स्वस्त?
Wine
| Updated on: Apr 28, 2026 | 1:17 PM
Share

भारत आणि न्यूझीलंडमध्ये कालच मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. यामुळे वाइन प्रेमींना चांगले दिवस येऊ शकतात. या करारातंर्गत पुढच्या दहावर्षात न्यूझीलंडवरुन भारतात येणाऱ्या वाइनवरील आयात कर 150 टक्क्यांनी घटवून 83 टक्के आणि नंतर 66 टक्क्यांपर्यंत आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हा फ्री ट्रेड एग्रीमेंट भारत आणि न्यूझीलंड दोन्ही देशांसाठी खूप खास आहे. या FTA मुळे मद्य आणि रेस्टॉरंट व्यावसायिक खुश आहेत. “जगातील 98 वाईनची माझी फेवरेट लिस्ट आहे, त्यात न्यूझीलंडच्या सात वाईन्स आहेत. पुढच्या दोन-तीन वर्षात या वाईन्स स्वस्त होतील. ग्राहकांच्या फायद्याचा हा निर्णय आहे” असं दिल्लीच्या ‘निसाबा’ रेस्टॉरंटशी संबंधित असलेल्या शुभम उपाध्यायने सांगितलं.

या प्रस्तावित कर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 वर्ष थांबावं लागणार आहे का? सोमेलियर आणि कॉर्पोरेट ट्रेनर गगन शर्मा यांनी भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “2022 मध्ये हा करार झालेला. वाइनवर कर कपात अशाच पद्धतीने होणार होती. रेस्टॉरंटच्या मेन्यूमधील वाईनच्या किंमतीत कपात दिसू लागली आहे” ‘अशाच प्रकारे न्यूझीलंडमधून येणाऱ्या वाईनच्या दरातील फरकही काही वर्षात दिसेल’ असं शर्मा म्हणाले.

वाईनचा एक वेगळा चाहता वर्ग

वाईन ही उन्हाळ्यासाठी बेस्ट मानली जाते. मीडियामध्ये सध्या ‘अल नीनो इफेक्ट’ मुळे येणार्‍या महिन्यात भीषण उकाड्याचा सामना करण्यासाठी तयार रहावं लागेल अशी चर्चा आहे. त्यावेळी वाईनमुळे मोठा दिलासा मिळू शकतो. न्यूझीलंडच्या ‘सौव ब्लैंक’ ‘मार्लबोरो’ या वाईनसह चाट खूप टेस्टी लागतो. न्यूझीलंडच्या ‘पिनो नोयर’वाईमध्येही लोकांना खूप इंटरेस्ट आहे. ही एक रेड वाईन आहे. या FTA करारामुळे लोकांचा न्यूझीलंडच्या वाईनमध्ये इंटरेस्ट वाढू शकतो. निसाबाचा सोमेलियर शुभमनुसार यामुळे वाईन शौकीनांना न्यूझीलंडच्या वाईनबद्दल जास्त माहिती मिळेल, ज्या बद्दल लोकांना कमी माहिती आहे. मद्य शौकीनांमध्ये वाईनचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अनेक वर्ष साठवून ठेवलेल्या वाईनची प्रति बॉटल किंमत खूप जास्त असते.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...