
दिल्लीमध्ये इंडिया एआई इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन करण्यात आले. या समिटला अनेक देशांनी सहभाग नोंदवला. जगातील नामवंत लोक सहभागी झाले. भारताने अनेक देशांसोबत मिळून महत्वाचे करार केले. तब्बल 88 देश या समिटमध्ये सहभागी झाली. हा भारताचा अत्यंत मोठा विजय म्हणावा लागेल. फ्रान्स, चीन, अमेरिका, ब्रिटेन या देशांसह जगातील तब्बल 88 देशांनी नवी दिल्लीतील डिक्लेरेशन ऑन एआय इम्पेक्टवर सही केली. हे घोषणापत्र एआयच्या भविष्यासाठी रूपरेखा तयार करते, शिवाय वैश्चिक मंचावर भारताने आपली ताकद देखील दाखवली. हा एक भारताचा मोठा विजय नक्कीच म्हणावा लागेल. मागच्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या एआय अॅक्शन समिटमध्ये अमेरिका आणि ब्रिटेन युरोपियन नियामकचे घोषणपापत्र सही करण्यास नकार दिला होता.
पण दिल्लीमध्ये झालेल्या परिषदेमध्ये सर्वजण एकत्र आल्याचे बघायला मिळाले आणि घोषणापत्रावर अमेरिका आणि ब्रिटेननेही सही केली. या घोषणापत्रावर 88 देशांनी सह्या केल्या. सर्व देशांना एकत्र आणण्यात मोठे यश भारताला मिळाले. भारताचा मुख्य उद्धेश एआय लोकशाहीकरण आहे. दिल्लीमध्ये या परिषदेचे खास आयोजन करून एका मंचावर सर्व देशांना आणण्यात भारताला यश मिळाल्याचे नक्कीच म्हणाले लागेल.
मुळात म्हणजे अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर भारत अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करताना दिसत आहे. शिवाय युरोपियन युनियनसोबत भारताने मुक्त व्यापार करार केली आहेत. शिवाय अमेरिकेने मोठी घोषणा करत भारतावर 50 टक्के टॅरिफ कमी करून 18 टक्क्यांवर आला. मात्र, टॅरिफच्या मुद्यात अमेरिकेत मोठ्या घडामोडी या घडताना दिसत आहेत.
अमेरिकेच्या कोर्टाने टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच फटकारले. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट शब्दात कोर्टाने म्हटले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक निर्णय घेत म्हटले की, आता 15 टक्के अतिरिक्त टॅरिफ सर्वच देशांवर लागू केला ज्याची अमंलबजालणी आम्ही लगेचच करत आहोत. मात्र, भारतावरील टॅरिफ वाढणार नसून भारतावर 18 टक्केच टॅरिफ कायम असणार आहे.