Operation Sindoor : भारताचा पराक्रम, पाकिस्तानने चीनच मार्केट आणि इज्जत दोन्ही घालवली

Operation Sindoor : रणागणात आज पाकिस्तानमुळे चीनवर नामुष्की झेलण्याची वेळ आली आहे. भविष्यात याचा चीनला मोठा फटका बसणार आहे. चीन नेहमी पाकिस्तानची पाठराखण करत असतो. पण आता पाकिस्तानमुळे चीनबद्दल चांगला संदेश जाणार नाहीय.

Operation Sindoor : भारताचा पराक्रम, पाकिस्तानने चीनच मार्केट आणि इज्जत दोन्ही घालवली
आता पाकिस्तान कूटनितीचा आधार घेतोय. पाकिस्तान अमेरिका, चीन या देशांच समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तरीही त्यांना अपेक्षित मदत मिळत नाहीय.
| Updated on: May 12, 2025 | 4:05 PM

पाकिस्तानचा सध्याचा जवळचा मित्र म्हणजे चीन. अमेरिकेपेक्षा पण पाकिस्तानला आज चीन जास्त जवळचा वाटतो. पाकिस्तान आपल्या बऱ्याच गरजांसाठी चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी पाकिस्तान जागितक बँक, अमेरिका आणि चीनवर अवलंबून आहे. चीन सुद्धा भारताच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी पाकिस्तानचा आपल्या सोयीनुसार वापर करत असतो. दहशतवादामुळे पाकिस्तानची जगामध्ये विश्वासहर्ता संपली आहे. पाकिस्तानला कुठल्याही देशाकडून अत्याधुनिक सैन्य तंत्रज्ञान मिळत नाही. त्यामुळे आज पाकिस्तान आपल्या संरक्षण गरजांसाठी मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तानकडे ड्रोनपासून ते मिसाईल, फायटर जेट चिनी बनावटीची आहेत.

नुकताच तीन दिवस भारत-पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष झाला. मूळात भारताने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केलेली. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांविरुद्धची लढाई आपली लढाई मानून भारताबरोबर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण केली. पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागली आहे. तीन दिवसाच्या या लढाईच्या निमित्ताने भारताने आपलं आधुनिक युद्ध कौशल्य जगाला दाखवून दिलं. पाकिस्तानवर मात केली. कालप्रमाणे आजही भारताच्या DGMO सैन्य दलांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत इंडियन एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांनी चिनी बनावटीच्या पाकिस्तानी शस्त्रांची काय हालत केली, ते पुराव्यासह दाखवून दिलं.

चीनवर नामुष्की झेलण्याची वेळ

चिनी बनावटीची मिसाइल, रॉकेट, ड्रोन्स भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच नष्ट केली. त्यांचे अवशेष पुरावे म्हणून दाखवले. यात चीनच्या घातक PL-15 मिसाइलचा ढिगारा दाखवला. चीनच एक शस्त्र भारताविरुद्ध चाललं नाही. चीनने अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीचे दावे करत आहे. त्यांच्याकडे पाचव्या पिढीच स्टेल्थ विमान आहे. आता ते अमेरिकेच्या आधी सहाव्या पिढीच फायटर जेट विकसित करत आहेत. पण खरोखर चीनच्या या सर्व शस्त्रांमध्ये दम आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. तीन दिवसांच्या या लढाईत भारताने चिनी शस्त्रांना त्यांची जागा दाखवून दिली. चीन पण अनेक देशांना शस्त्रांची निर्यात करतो. त्यांच्या या बाजारपेठेला, विश्वसनीयतेला फटका बसू शकतो. पाकिस्तानमुळे चीनवर ही नामुष्की झेलण्याची वेळ आली आहे.