2060 पर्यंत जगातली सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या भारतात असेल

वॉशिंग्टन : अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरने जगभरातील मुस्लीम आकडेवारीवर नवे आकडे सादर केले आहेत. सोबतच 2060 पर्यंत सर्वाधिक मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकसंख्या असणाऱ्या देशांचीही यादी प्रसिद्ध केली आहे. सध्या इंडोनेशियामध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या (21 कोटी) आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सध्या 19 कोटी 48 लाखांपेक्षा जास्त मुस्लीम लोकसंख्या आहे. पाकिस्तानमध्ये एकूण …

2060 पर्यंत जगातली सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या भारतात असेल

वॉशिंग्टन : अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरने जगभरातील मुस्लीम आकडेवारीवर नवे आकडे सादर केले आहेत. सोबतच 2060 पर्यंत सर्वाधिक मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकसंख्या असणाऱ्या देशांचीही यादी प्रसिद्ध केली आहे. सध्या इंडोनेशियामध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या (21 कोटी) आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सध्या 19 कोटी 48 लाखांपेक्षा जास्त मुस्लीम लोकसंख्या आहे. पाकिस्तानमध्ये एकूण 18 कोटी 40 लाख मुस्लीम आहेत. तर बांगलादेश चौथ्या आणि नायजेरिया पाचव्या क्रमांकावर आहे.

‘प्यू रिसर्च’च्या आकडेवारीनुसार, 2060 पर्यंत भारत हा सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारा देश असेल. 2060 पर्यंत भारतात मुस्लिमांची लोकसंख्या 3,33,090,000 एवढी असेल. ही लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 19.4 टक्के असेल, तर जगातील एकूण मुस्लीम लोकसंख्या 11.1 टक्के असेल, असाही अंदाज वर्तवण्यात आलाय.

मुस्लीम राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानलाही भारत मागे टाकणार आहे. 2060 पर्यंत पाकिस्तानमध्ये मुस्लिमांची एकूण लोकसंख्या 28.36 कोटी असेल. हा आकडा पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या एकूण 96.5 टक्के आहे. तर जगभरातील मुस्लीम लोकसंख्येमध्ये पाकिस्तानचं योगदान हे 9.5 टक्के असेल.

2060 पर्यंत नायजेरियाची मुस्लीम लोकसंख्या 28.31 कोटी होईल आणि या देशाचा सर्वाधिक मुस्लीम असणाऱ्या देशांच्या यादीत तिसरा क्रमांक असेल. सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियात मुस्लीम लोकसंख्येच्या वाढीत घट झाल्याचं चित्र आहे. कारण, इंडोनेशियाचा क्रमांक चौथा (25.34 कोटी) वर्तवण्यात आलाय. ही 2060 पर्यंत जगातील 8.5 टक्के मुस्लीम लोकसंख्या असेल.

सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येच्या देशांची यादी (2060 पर्यंत)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *