AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Taliban Relations : मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक, डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानला झटका देत भारताने तालिबानबद्दल घेतला एक मोठा निर्णय

India Taliban Relations : मुताकी तालिबान शासनातील पहिले परराष्ट्र मंत्री आहेत, जे भारत दौऱ्यावर आलेत. नवी दिल्लीला येण्याआधी मुताकी यांनी तालिबानी लीडर अखुंजदा यांची भेट घेतलेली. भारताचा निर्णय अमेरिका, पाकिस्तान दोघांसाठी झटका आहे.

India Taliban Relations : मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक, डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानला झटका देत भारताने तालिबानबद्दल घेतला एक मोठा निर्णय
aamir khan mutaki meet Jaishankar
| Updated on: Oct 10, 2025 | 1:47 PM
Share

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दूतावास सुरु करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी यांच्यासोबतच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही घोषणा केली. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या अखंडतेच समर्थन केलं. 2021 नंतर पहिल्यांदाच भारताने अफगाणिस्तानच्या संप्रभुतेला पूर्ण समर्थन दिलय.

मुताकीसोबतच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, “भारताने नेहमीच अफगाणिस्तानची साथ दिली आहे. अफगाणी आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अफगाणिस्तानने अलीकडेच दहशतवादाविरुद्ध लढाईत आम्हाला साथ दिलेली. पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला”

जयशंकर काय म्हणाले?

अफगाणिस्तानात सध्या रशिया आणि पाकिस्तान या देशांचे दूतावास आहेत. काबूलमध्ये भारताचा उच्चायोग आहे. पण तो दूतावास नाहीय. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर भारत सायलेंट मोडमध्ये होता. पण आता भारताने अफगाणिस्तानात दूतावास खोलण्याची घोषणा केली आहे. जयशंकर पुढे म्हणाले की, “अफगाणिस्तानात विकास आणि मानवी सहाय्यतेच भारताचं काम सुरु राहिलं. त्याशिवाय अफगाणिस्तानात ज्या प्रोजेक्ट्सची भारताने घोषणा केलेली, ते आम्ही पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत आहोत” भारताने अफगाणिस्तानला 20 रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली आहे.

तालिबानने भारताला काय शब्द दिलाय?

जयशंकर यांच्यासोबतच्या बैठकीत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुताकी म्हणाले की, “भारत नेहमीच अफगाणी जनतेसोबत उभा राहिलाय. आम्ही भारताविरुद्ध कुठलही कट, कारस्थान रचू देणार नाही” दोन्ही देशांमध्ये क्रॉस बॉर्डर टेररिज्म बद्दलही चर्चा झाली. मुताकी तालिबान शासनातील पहिले परराष्ट्र मंत्री आहेत, जे भारत दौऱ्यावर आलेत. नवी दिल्लीला येण्याआधी मुताकी यांनी तालिबानी लीडर अखुंजदा यांची भेट घेतलेली.

भारताचा मास्टर स्ट्रोक कसा?

अफगाणिस्तानात दूतावास सुरु करण्याचा भारताचा निर्णय म्हणजे सध्याच्या परिस्थितीत मास्टर स्ट्रोक आहे. तालिबान सरकारला अजून जगातल्या अनेक देशांनी मान्यता दिलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तालिबानला बगराम एअर बेसवरुन वाईट परिणाम भोगण्याच्या धमक्या देत आहेत. भारत आणि तालिबानचे संबंध सुधारावेत अशी पाकिस्तानची सुद्धा इच्छा नाहीय. पण भारताने आता थेट तालिबान राजवटीत दूतावास सुरु करण्याचा निर्णय घेऊन दोन्ही देशांना मोठा धक्का दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.