Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईत पार्कींगवरुन भिडले भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक, कोर्टाने एकाला देशातून काढले

आपल्या येथे गृहनिर्माण सोसायट्यात पार्किंगवरुन भांडण नेहमीची असतात. तसाच प्रकार दुबईत भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांत घडला आहे. आधी शाब्दीक बाचाबाची होऊन नंतर हे प्रकरण हाणामारीवर पोहचले...

दुबईत पार्कींगवरुन भिडले भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक, कोर्टाने एकाला देशातून काढले
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 10:38 PM

दुबई कठोर कायदा पालनासाठी ओळखला जातो. तसेच सर्वात सुरक्षित देश म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे दुबईतून कठोर कायदे नेहमीच बातम्यात असतात. अलिकडे एक असे प्रकरण उघडकीस आले आहे त्यात साध्या पार्किंगच्या भांडणातून दोन पर्यटकांना दुबईतील कठोर कायद्याचा सामना करावा लागला आहे. यात एकाला दुबई सोडून जावे लागले आहे.

पार्किंगवरुन भांडण झाल्याने शिक्षा

दुबईतील एका टेलकॉम परिसरात वाहन पार्किंग करण्यावरुन झालेली शाब्दीक बाचाबाची मारहाणीत रुपांतरीत झाली. हे प्रकरण अखेर कोर्टात गेले.कोर्टाने या प्रकरणात पाकिस्तानी बुजुर्गाला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना देशातून बाहेर जाण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. गल्फ न्यूजच्या मते ही घटना गेल्या वर्षीच्या ८ फेब्रुवारीची आहे.

कसे झाले भांडण

मिळालेल्या माहितीनुसार ७० वर्षांच्या पाकिस्तानी इसमाने पार्किंगची जागेवर दावा केला होता. ज्यास ३४ वर्षीय भारतीय नागरिक वापरु इच्छीत होता. त्यावरुन दोघांत बाचाबाची झाली. त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या ७० वर्षांच्या बुजुर्गाने भारतीय व्यक्तीला जोराने धक्का मारला. त्यामुळे भारतीय व्यक्तीचा तोल जाऊन तो जमिनीवर पडाला. मेडीकल अहवालानुसार भारतीय व्यक्तीच्या डाव्या पायाच्या हाडात फॅक्चर झाले. त्यामुळे त्याच्या नसांना देखील धक्का बसून स्नायूंना सूज आली. त्यामुळे या जखमेने त्याच्या पायांची ५० टक्के कार्यक्षमता नष्ट झाली. त्यामुळे त्याला कायमस्वरुपाचे अपंगत्व आले.

हे सुद्धा वाचा

भारतीयाने देखील प्रतिकार केला

त्या घटनेनंतर भारतीय इसमाने देखील पाकिस्तानी इसमावर हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानी व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली आहे. याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानी व्यक्ती २० दिवस दैनंदिन काम करु शकला नाही.

तपासात काय आढळले

या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्या दोघांना ताब्यात घेतले. कोर्टात दोन्ही पक्षाचा मेडिकल रिपोर्ट, फोरेन्सिक पुरावे आणि साक्षीदारांची जबानी झाली. त्यानंतर पाकिस्तानी इसमाने धक्का मारल्याची कबूली दिली. परंतू त्याने असा हल्ला करण्यासाठी मला उकसवल्याचा आरोप भारतीय तरुणावर केला.

कोर्टाचा निकाल

दुबईच्या क्रिमिनल कोर्टाने या ७० वर्षीय पाकिस्तानी बुजुर्गाला शारीरिक इजा करण्याच्या गुन्ह्याखाली दोषी सिद्ध करीत तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच शिक्षा भोगल्यानंतर दुबईतून निघून जाण्याचे देखील आदेश दिले.तसेच भारतीय तरुणाचे प्रकरण अन्य कोर्टात पाठवून त्याच्या विरोधात कमी गंभीर आरोपांवर खटला चालणार आहे. गल्फ न्यूजच्या मते ही घटना गेल्या वर्षीच्या ८ फेब्रुवारीची आहे.

गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.