AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाऊद इब्राहिम याला भारत सरकारचा मोठा दणका, थेट मोठी कारवाई, विदेशातून…

भारत सरकारला अत्यंत मोठे यश मिळाले. भारत सरकारने थेट दाऊद इब्राहिम याला मोठा धक्का दिला. त्याच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या व्यक्तीला थेट भारतात आणले. त्याची चाैकशी केली जात आहे. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांकडे स्वाधीन केले जाईल.

दाऊद इब्राहिम याला भारत सरकारचा मोठा दणका, थेट मोठी कारवाई, विदेशातून...
Dawood Ibrahim shock
| Updated on: Apr 28, 2026 | 8:53 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात भारत अॅक्शन मोडवर आहे. दाऊद इब्राहिम भारताकडून अत्यंत मोठा दणका देण्यात आला. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगितले जाते. भारतातून पळून तो पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. आता पाकिस्तानमध्ये बसलेल्या दाऊद इब्राहिमला मोठा झटका भारत सरकारने दिला. दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम डोला याला भारतात आणण्यात मोठे यश मिळाले. सलीम डोला हा दाऊद इब्राहिम याचा अत्यंत जवळचा मानला जातो. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला सातसमुद्रपार करून भारतात आणण्यात आले. गुप्तचर विभागाने आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने ही कारवाई केली. दिल्लीतील विमानतळावरून त्याला आता चाैकशीसाठी नेण्यात आले. गुप्तचर यंत्रणा डोलाची चाैकशी करत असल्याची माहिती आहे. सलीम डोला याला भारतात आणणे म्हणजे हा भारताचा अत्यंत मोठा विजय मानला जात आहे.

सलीम डोला याला भारतात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. आज सकाळीच त्याला विशेष विमानाने आणल्याचे कळतंय. विशेष म्हणजे गुप्तचर विभागाच्या चाैकशीनंतर सलीम डोला याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. डोला याला इस्तंबूलमध्ये अटक करण्यात आली होती. आज सकाळी इस्तंबूलहून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. ज्यासाठी एक यंत्रणा काम करत होती.

मुंबईच्या गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या तस्करीत प्रमुख सलीम डोला आहे. ज्याचा शोधात भारत सरकार होते. अखेर त्याला पकडण्यात यश मिळाले. छोटा शकीलने सुरुवातीला त्याच्यावर मुंबई आणि आसपासच्या परिसरात गांजा पुरवण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील भारताबाहेर पळून गेले.

सलीम डोला भारतातच राहिला आणि डी कंपनीसाठी अमली पदार्थांचे नेटवर्क सांभाळत होता. त्यानंतर तो दाऊद इब्राहिमच्या अत्यंत जवळ पोहोचला. भारतात गुन्हेगारी कारवाई त्याने घडवून आणल्या. त्यानंतर त्यानेही भारतातून पळ काढला. अखेर त्याला भारतात आणण्यात मोठे यश यंत्रणांना मिळाले. आता त्याच्याकडून मोठी माहिती मिळू शकते. हा दाऊद इब्राहिम याच्याकरिता अत्यंत मोठा धकका नक्कीच म्हणाला लागेल.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी