तो नमाजसाठी उठला.. भारतीय पायलट स्मित मच्छार यांचा थेट खुलासा, फ्लायदुबईच्या विमानात 4 मिनिटे..
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. ज्याने एकच खळबळ उडाली. भारतीय पायलटमुळे आज 180 जण सुरक्षित आहेत. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. नक्की विमानात काय घडले हे स्मित यांनी सांगितले आहे.

दुबईहून तेल अवीवकडे जाणारे फ्लायदुबईचे FZ1073 विमान 34,000 उंचीवर होते. या विमानात 174 प्रवासी होते. या विमानाचे भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर मोठा हल्ला करण्यात आला. ओमानचा को पायलटला हे विमान क्रॅश करायचे होते. पण भारतीय पायलटने गंभीर जखमी होऊनही त्याला तसे करण्यापासून रोखले. भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी विमानात नक्की काय घडले याचा पूर्ण घटनाक्रम सांगितला. दुबईमध्ये स्मित मच्छार यांच्यावर उपचार सुरू आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्मित यांना फोन करून संवाद साधला. हेच नाही तर स्मित यांच्या धैर्याचा आणि शाैर्याचा सन्मान करण्याचा निर्णय इस्त्रायलने घेतला. स्वातंत्र्य दिवसाचा सर्वात मोठा सन्मानमध्ये स्मित यांना नेतान्याहू यांनी आमंत्रित केले. यादरम्यान कॉकपिटमध्ये नक्की काय घडले याचा खुलासाही त्यांनी स्वत: पहिल्यांदाच केला.
नेतन्याहू यांना बोलताना स्मित मच्छार यांनी म्हटले की, सर्वकाही एकदम व्यवस्थित सुरू होते. त्याचवेळी को पायलट नमाजसाठी उठला. स्थानिक पायलट हे नेहमीच करतात. त्यांच्या धर्माचा सन्मान करण्यासाठी मी पुढे तोंड केले आणि मागे बघितले नाही. मात्र, त्यानंतर चार ते पाच मिनिटांनंतर मला जोरात आवाज आला. मला वाटले की, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आणि हा त्याचा आवाज आहे. पण माझ्या डोक्यावर मारले गेले आणि माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण अंधार झाला.
मला समजले की, हा स्फोट नाही तर माझ्यावर हल्ला करण्यात आला. ज्यावेळी हे सर्व सुरू होते, त्यावेळी आमचे विमान प्रचंड वेगाने खाली आले. प्रवासी जोरजोरात ओरडत होते. कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न बाहेरून केला जात होता. पण तयाने रिस्पॉन्स ब्लॉक केला होता. आता दरवाजा उघडण्याचा एकच पर्याय होता. तो म्हणजे आतमधून टिस्ट नॉबवर हात फिरवणे. मी त्यावेळी विचार केला की, मी जर आता काही केले नाही तर काहीच उरणार नाही.
मी पूर्ण ताकद लावून दरवाजा उघडला. त्यावेळी सुदैवाने लोक बाहेरच होते आणि सर्व बघून ते आत शिरले आणि त्यांनी आतमधील परिस्थिती आपल्या हातात घेतली. इस्त्रायलचा सर्वात मोठा सन्मान स्मित मच्छार यांना दिला जाणार आहे. नेतन्याहू यांनी स्मित मच्छार यांना म्हटले की, इस्त्रायल, भारत आणि जगासाठीत तुम्ही खरे हिरो आहात. हा सन्मान फक्त इस्त्रायली व्यक्तींना दिला जातो, पण आज पूर्ण इस्त्रायल तुमच्यासमोर नतमस्तक आहे.
