
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर असून त्यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये काही वेळ बैठक झाली आणि महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले. नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, भारत आणि चीनच्या नात्यावर तिसऱ्या देशाने लेंसने बघण्याची गरज नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग हे 31 व्या एससीओ शिखर संमेलनमध्ये सहभागी झाले आहेत. अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जपानची यात्रा केली. यावेळी त्यांनी काही महत्वाचे करार केले. जपानच्या यात्रेवरून आल्यानंतर लगेचच मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या विरोधात रणनीती आखली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर गंभीर टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन यांचा एक फोटो चीनमधील बैठकीपूर्वीचा पुढे आला आहे. हा फोटो पाहून डोनाल्ड ट्रम्प यांचा भडका उडणार हे नक्की आहेत. नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी या फोटोच्या माध्यमातून जगाला अत्यंत मोठा संदेश दिला आहे. दोन्ही महासत्ता देशाचे नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले.
या फोटोच्या माध्यमातून जगाला आणि खास करून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा संदेश मोदी आणि पुतिन यांनी दिला आहे.
SCO शिखर परिषदेत 2025 भारताला मिळालेल्या मोठ्या यशानंतर संपूर्ण जगाच्या नजरा पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या भेटीवर खिळल्या आहेत. दोन्ही नेते एकाच गाडीतून द्विपक्षीय चर्चेच्या ठिकाणी रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा फोटो शेअर केला आहे. दोन्ही देशातील मैत्री या फोटोच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसते. पाकिस्तानचेही टेन्शन या फोटोमुळे वाढले असावे.
रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिका भारतावर सातत्याने दबाव टाकत आहे. याचाच एका भाग म्हणजे अमेरिकेने भारतावर तब्बव 50 टक्के टॅरिफ लावले आहे. असे असले तरीही भारताने रशियाची साथ सोडली नाहीये. SCO शिखर परिषदेच्या माध्यमातून अमेरिकेच्या विरोधात भारत, रशिया आणि चीन एकत्र येताना दिसत आहेत. यासोबतच पाकिस्तानला देखील मोठा संदेश देण्यात आलाय.