तुर्कीतील भूकंप बचाव पथकात भारतीय महिला अधिकारी; पीडितांना मदत करणाऱ्या कोण आहेत बीना तिवारी?

बीना तिवारी यां कर्नल यदुवीर सिंह यांच्या कमांडमध्ये एकमेव महिला डॉक्टर अधिकारी आहेत. यापूर्वी त्या आसाममध्ये तैनात होत्या. त्यांचे पती देशातचं मेडिकल अधिकारी आहेत.

तुर्कीतील भूकंप बचाव पथकात भारतीय महिला अधिकारी; पीडितांना मदत करणाऱ्या कोण आहेत बीना तिवारी?
डॉ. बीना तिवारी
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 6:09 PM

नवी दिल्ली : तुर्की (Turkey) आणि सीरियात सहा फेब्रुवारी रोजी भूकंप आला. आतापर्यंत या भूकंपात (Earthquake) सुमारे २१ हजार लोकांचा बळी गेला. तुर्कीच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन दोस्त सुरू केला. मलब्यातून मृतदेहांना तसेच जीवंत लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना आणि एनडीआरएफची टीम काम करत आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी एक महिला डॉक्टर बीना तिवारी (Bina Tiwari ) यांचा फोटो व्हायरल झाला. त्या फोटोत डॉ. तिवारी या वयस्क महिलेची गळाभेट घेत आहेत. तुर्कीत बचाव कामात सहकार्य करणाऱ्या भारतीय महिला अधिकारी मेजर बीना तिवारी यांचा फोटो व्हायरल झाला. त्या फोटोमध्ये त्या एका वयस्क महिलेची गळाभेट घेत आहेत. १४ डॉक्टर आणि ८६ आरोग्य कर्मचारी भारतीय सेनेच्या मेडिकल टीमसोबत आहेत. रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी होत आहे. भूकंपात कित्तेक जण जखमी झाले आहेत.

कोण आहेत बीना तिवारी

बीना तिवारी (वय २८) या डेहराडूनच्या रहिवासी आहेत. त्यांनी दिल्लीतील आर्मी सायन्स ऑफ मेडिकल सायन्समधून पदवी घेतली. डॉक्टर असणाऱ्या तिवारी त्यांच्या तिसऱ्या पिढीत देशसेवा करत आहेत. बीना तिवारी यां कर्नल यदुवीर सिंह यांच्या कमांडमध्ये एकमेव महिला डॉक्टर अधिकारी आहेत. यापूर्वी त्या आसाममध्ये तैनात होत्या. त्यांचे पती देशातचं मेडिकल अधिकारी आहेत.

विद्यापीठाचे प्राध्यापक बनले स्वयंसेवक

इस्तांबूल विद्यापीठाचे प्राध्यापक फुरकान आणि त्यांची पत्नी मल्लिका तुर्कीत भारतीय सेनेच्या रुग्णालयात भाषांतरकार म्हणून स्वयंसेवक बनलेत. हे दाम्पत्य अदानावरून इस्तांबूलला परत जात होते. तेव्हा भारतीय आरोग्य पथक तिथं पोहचले. यामुळं प्रभावित होऊन ते भारतीय आरोग्य पथकासोबत रुग्णालयात पोहचले.

अमेरिका आणि जागतिक बँकेचे मदतीचे आवाहन

भूकंप पीडित लोकांना वेळेवर मदत मिळाली नाही. तर त्यांचा मृत्यू उपासमार, थंडी यामुळं होऊ शकतो. अशावेळी जागतिक बँकेने तुर्कीला १.७८ बिलीयन डॉलर देण्याची घोषणा केली. अमेरिकेने भूकंप पीडितांच्या मदतीसाठी ८५ मिलीयन डॉलरच्या मदतीची घोषणा केली.

६ फेब्रुवारीला तुर्कीत ५ वेळा भूकंप

तुर्कीत भूकंपाचा पहिला धक्का ६ फेब्रुवारी रोजी ४.१७ वाजता आला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.८ होती. भूकंपाचे केंद्र दक्षिण तुर्कीचे गाजीयांटेप आहे. काही वेळानंतर ६.४ रिश्टर स्केलचा आणखी भूकंप आला. त्यानंतरही भूकंपाचे धक्के येणे सुरूच होते. सलग पाच वेळी भूकंपाने हादरे दिले. यात कित्तेक लोकं बळी गेलेत.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.