मोठी बातमी! 14 वर्षाच्या पोराचा शाळेबाहेर अंधाधुंद गोळीबार, 3 शिक्षक आणि 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू

शाळेमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून, 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मोठी बातमी! 14 वर्षाच्या पोराचा शाळेबाहेर अंधाधुंद गोळीबार, 3 शिक्षक आणि 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Thailand School firing
Image Credit source: ANI
| Updated on: Aug 07, 2026 | 5:55 PM

मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी शाळेमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शाळा सुरू होती, याचदरम्यान शाळेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये जवळपास 15 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत, तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना थायलंडच्या नोथबरी प्रांतामध्ये असलेल्या एका शाळेमध्ये घडली आहे, शुक्रवारी अचानक शाळेत अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ज्याने गोळीबार केला, त्या संशयित आरोपीचा देखील समावेश आहे, तर तीन  शिक्षकाचा देखील मृत्यू झाला आहे. तर 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची स्थिती ही गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत माहिती देताना नोंथबुरी प्रातांचे कमांडर लेफ्लिनंट कर्नल देचरापी कोंगडी यांनी सांगितलं की शाळेच्या परिसरात गोळीबार झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत. आम्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट पसरली होती. घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

एका चौदा वर्षांच्या मुलाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत तीन शिक्षक आणि तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान ज्या मुलाने गोळीबार केला, त्याचा देखील या गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us