AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीमनवार यांचा राजीनामा होणार? देवेंद्र फडणवीसांची तयारी पण…मुख्यमंत्र्यांचं सर्वात मोठं विधान, समोर ठेवली एक अट!

आता पूर्णपणे बेकायदेशीर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारने विद्यार्थीनिष्ट भूमिका घेतली. पेपरफुटी झाली तेव्हा भीमनवार हे एमपीएससीचे अध्यक्ष नव्हतेच, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भीमनवार यांचा राजीनामा होणार? देवेंद्र फडणवीसांची तयारी पण...मुख्यमंत्र्यांचं सर्वात मोठं विधान, समोर ठेवली एक अट!
mpsc pune student protest and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 5:29 PM
Share

Pune MPSC Protest : सध्या पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. विशेष म्हणजे अनेक बड्या नेत्यांनी आंदोलनस्थळी जात आपण विद्यार्थ्यांसोबत आहोत, असं सांगितलंय. या आंदोलनाचे नेतृत्त्व आमदार राहुल गांधी करत आहेत. काहीही झालं तरी नैतिकतेच्या मुद्द्यावरून एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जातेय. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाबाबत मोठं विधान केलंय. विशेष म्हणजे एक अट समोर ठेवून त्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष बदलण्याची शिफारस करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी दुष्काळ तसेच इतर काही मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भूमिका व्यक्त केली. पुण्याच्या आंदोलनात काही राजकीय विद्यार्थी असले तरीही काही विद्यार्थीही आहेत. त्यामुळे हे आंदोलन संयमाने हाताळण्याचाच पोलिसांचा पवित्रा आहे. 15 लोकांचे शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते. या शिष्टमंडळाने एकूण पाच मागण्या केल्या होत्या. त्यातील पहिली मागणी ही एमपीएससीच्या अध्यक्षांना पदावरून दूर करणे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे अशी होती. यावेळी एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवण्याचा अधिकार हा केवळ राष्ट्रपतींकडे आहे. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सांगतात. सर्वोच्च न्यायालय चौकशी करतं त्यानंतर राष्ट्रपती एमपीएससीच्या अध्यक्षांना काढू शकतात, हे आम्ही शिष्टमंडळाला सांगितले होते. तुम्ही म्हणत असाल तर आम्ही न्यायालयीन चौकशी कराला तयार आहोत, असं आम्ही त्या शिष्टमंडळाला सांगितले होते. त्यावेळी शिष्टमंडळाने मागण्या मान्य झाल्याचे पत्र त्यांनी मागितले होते. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.

आता पूर्णपणे बेकायदेशीर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारने विद्यार्थीनिष्ट भूमिका घेतली. पेपरफुटी झाली तेव्हा भीमनवार हे एमपीएससीचे अध्यक्ष नव्हतेच. राज्य सरकारने भीमनवार यांची चौकशी करण्याचेही मान्य केले. त्या पेपरफुटीत त्यांचा दुरान्वयानेही संबंध आला तर राज्य सरकार स्वत: अनुच्छेद 317 अंतर्गत शिफारस करून भीमनवार यांना अध्यक्षपदापासून दूर करायला सांगेल, असं आम्ही सांगितलेलं आहे. यापेक्षा सरकार वेगळी भूमिका काय घेऊ शकतं? असा सवालही फडणवीस यांनी केला.

Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...