जंतरमंतरवर निघालेल्या खासदारांच्या बसच्या चाकांची हवा सोडली, विरोधक आक्रमक, राहुल गांधी, प्रियंका गांधींचा रस्त्यावरच ठिय्या
मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाले आहेत. आज दिल्लीमधील जंतरमंतर येथे विरोधी पक्षांच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाले आहेत. आज दिल्लीमधील जंतरमंतर येथे विरोधी पक्षांच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तीन बस भरून खासदार जंतरमंतरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा देखील समावेश आहे. मात्र या बस पोलिसांनी रस्त्यातच अडवल्या आहेत, त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी बॅडिगेट्स लावले आहेत, बस पुढे जाऊ देत नसल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदारांकडून भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
दरम्यान खासदार ज्या बसमध्ये होते, त्या बसची हवा सोडण्यात आल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गाधी या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी?
सध्या विविध राज्यांमध्ये एसआयआरची प्रक्रिया सुरू आहे, यावरून विरोधी पक्षांनी अनेक आरोप केले आहेत. संपूर्ण एसआयआर प्रक्रियाच रद्द करावी, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांची आहे. त्यासाठी मंगळवारी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधी पक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. आज दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर खासदारांना आंदोलन करायचं होतं, तीन बस भरून खासदार जंतरमंतरच्या दिशेनं निघाले देखील होते. परंतु त्यांच्या बस पोलिसांनी रस्त्यातच अडवल्या आहेत. बसच्या चाकांची हवा सोडण्यात आली आहे, त्यानंतर आता राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
