Iran-Israel War News : आर्यन डोम असूनही रात्रभर सायरनचे आवाज, बंकरकडे पळणारे लोक, रात्री इस्रायलमध्ये काय घडलं?
Iran-Israel War : इस्रायलच्या ऑपरेशन रायजिंग लायनला इराणने 'ट्रू प्रॉमिस 3' ने उत्तर दिलं आहे. इस्रायलकडे आर्यन डोम, डेविड स्लिंग यांच्या रुपाने अभेद्य सुरक्षाकवच आहे. मात्र, इस्रायलमध्ये रात्रभर सर्वत्र सायरनचे आवाज ऐकू येत होते. लोक सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यासाठी बंकरच्या दिशेने पळत होते. आकाशातून मिसाइलचा पाऊस पडत होता. रात्रभर इस्रायलमध्ये काय चाललेलं, जाणून घ्या.

इस्रायल-इराण युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इस्रायलने सलग दुसऱ्यादिवशी इराणवर एअर स्ट्राइक केला. नेतान्यूह यांचं सैन्य इराणच्या अणवस्त्र तळांना लक्ष्य करुन हल्ले करत आहे. शुक्रवारी रात्री उशिराने इस्रायलने लागोपाठ इराणवर मिसाइल्स डागली. इराणने सुद्धा प्रत्युत्तराची कारवाई करत इस्रायलवर मोठा मिसाइल हल्ला केला. इस्रायली सैन्याने 13 जूनच्या सकाळी इराणवर हल्ला केला. याला Operation Rising Lion नाव देण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये इस्रायलने आपल्या 200 फायटर जेट्ससह इराणच्या 100 पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ले केले. यात इराणचे अणवस्त्र तळ आणि सैन्य ठिकाणं होती. यात इराणी सैन्याचे अनेक बडे लष्करी अधिकारी मारले गेले.
इराणने सुद्धा आपल्या ऑपरेशनला ‘ट्रू प्रॉमिस 3’ च नाव देत इस्रायलवर प्रतिहल्ला केला. त्यामुळे काल रात्रभर इस्रायलच्या अनेक शहरात सायरन वाजत होते. उत्तर इस्रायलमध्ये लोकांनी बंकर्समध्ये आसरा घेतला. लोकांना बॉम्ब शेल्टर्समध्ये जाण्याच अपील करण्यात आलं. इराणने 150 पेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स इस्रायलवर डागली. यात 6 मिसाइल्स राजधानी तेल अवीवमध्ये पडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. 63 लोक जखमी झाले. इराणी मीडिया रिपोर्ट्नुसार इस्रायली संरक्षण मंत्रालयाला सुद्धा लक्ष्य करण्यात आलं.
देशभरात आणीबाणी जाहीर
इराणने सध्याची स्थिती लक्षात घेता आपली एअरस्पेस बंद केली आहे. देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे. आमच्या एअर डिफेन्स सिस्टिमने इराणचे बहुतांश ड्रोन आणि मिसाइल हवेतच नष्ट केले असा दावा इस्रायलच्या सुरक्षा पथकांनी केला आहे. इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तात्काळ बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. इस्रायली हल्ल्यांना आक्रमक सैन्य कारवाई ठरवलय.
תיעוד מיירוט כטב״ם איראני ששוגר מוקדם יותר היום על ידי מסוק קרב של חיל האוויר pic.twitter.com/rYm8m8VLhF
— צבא ההגנה לישראל (@idfonline) June 13, 2025
शेकडो ड्रोन्स आणि मिसाइल्स डागले
याआधी इराणने एप्रिल 2024 मध्ये ऑपरेशन ‘ट्रू प्रॉमिस 1’ लॉन्च केलं होतं. यात इस्रायलवर हल्ला केला होता. 1 एप्रिल 2024 रोजी सीरियामध्ये इराणी दूतावासावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल विरोधात ही कारवाई केली होती. इराणी रिवॉल्यूशनरी गार्ड्स या ऑपरेशनमध्ये इस्रायलवर शेकडो ड्रोन्स आणि मिसाइल्स डागले होते.