इस्रायलविरुद्धच्या युद्धानंतर आता इराण गद्दारांच्या शोधात, 700 जणांवर कठोर कारवाई

इराणला वाटत आहे की, देशातील लोकांनी विश्वासघात करत इस्रायलला मदत केली. आतापर्यंत अनेक ज्यू नेत्यांना इस्रायलशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

इस्रायलविरुद्धच्या युद्धानंतर आता इराण गद्दारांच्या शोधात, 700 जणांवर कठोर कारवाई
iran arrests spies
| Updated on: Jun 29, 2025 | 4:24 PM

इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणला आपल्या अनेक अधिकाऱ्यांना गमवावे लागले होते. या युद्धात इराणची हवाई संरक्षण यंत्रणा अपयशी ठरली होती. त्यामुळे इराणला वाटत आहे की, देशातील लोकांनी विश्वासघात करत इस्रायलला मदत केली. इराणमध्ये राहणाऱ्या ज्यू नागरिकांवर संशय घेतला जात आहे. आतापर्यंत अनेक ज्यू नेत्यांना इस्रायलशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यात 12 दिवस युद्ध सुरु होते. या युद्धानंतर देशासोबत गद्दारी करणाऱ्या नागरिकांचा शोधात आहे. सुरुवातील 35 ज्यू नागरिकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र आता हा आकडा वाढला आहे. इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 700 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना परदेशातील लोकांशी संपर्क न ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी छापेमारी

इराणमधील ज्यू समुदायाच्या एका व्यक्तीने सांगितले की, आतापर्यंन अनेक लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र चौकशीसाठी हजर न राहणाऱ्यांवर अचानक छापे टाकले जात असून अचानक त्यांना अटक केली जात आहे. एका महिलेने सांगितले, रात्री 1.30 वाजता, इराणी सैन्याने अचानक भिंतीवरून उडी मारून आमच्यासोबत असलेल्या ज्यू लोकांना बंदुकीचा धाक दाखवत अटक केली, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.

अनेकांवर इस्लायली संबंध असल्याचा आरोप

इराणमध्ये 8 ते 10 हजार ज्यू लोक राहतात.तेहरान आणि शिराझमधील अनेक धार्मिक नेते आणि ज्यू लोकांवर कोणत्याही पुराव्याशिवाय इस्रायलशी संबंध असल्याचा करत आहेत. तसेच इराणी अधिकाऱ्यांनी अनेक ज्यू कुटुंबांना अटक करत केली असून त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.

इराणमध्ये गद्दारांना फाशीची शिक्षा

इराणमध्ये परदेशी गुप्तचर संस्थांसाठी काम करणाऱ्या एजंट्सना अटक केली जाते आणि आरोप सिद्ध झाल्यानंतर फाशी देतो. मृत्युदंड देण्याच्या बाबतीत इराण चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्येही गद्दारी केलेल्या लोकांना फाशीची शिक्षा दिली जाते.