AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणकडून भारताच्या जहाजावरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, पत्रकाराची थेट हकालपट्टी

Donald Trump Angry : होर्मुज सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर इराणने हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. याबाबत एका पत्रकाराने ट्रम्प यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र यावर ते संतापल्याचे पहायला मिळाले.

इराणकडून भारताच्या जहाजावरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, पत्रकाराची थेट हकालपट्टी
Trump Angry IranImage Credit source: Google
| Updated on: Apr 19, 2026 | 11:08 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अद्याप पूर्णपणे थांबलेले नाही. अलीकडेच होर्मुज सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर इराणने हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. या घटनेवर भारत सरकारने नाराजी व्यक्त करत इराणी राजदुताकडे उत्तर मागितले होत. अशातच आता याबाबत एका पत्रकाराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रश्न विचारताच ते संतप्त झाले आणि त्यांनी त्या पत्रकाराला बाहेर जाण्यास सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. CBS News च्या पत्रकाराने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, यानंतर ट्रम्प यांच्या वर्तनावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प संतापले

CBS न्यूजच्या पत्रकार ओलिविया रिनाल्डी यांनी 18 एप्रिल रोजी इराणमधील परिस्थिती आणि होर्मुजमधील ताज्या घडामोडींवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी इराणकडून दोन भारतीय जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबतही प्रश्न विचारला. मात्र यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राग व्यक्त करत रिनाल्डी आणि इतर पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले. रिनाल्डी यांनी नंतर हा व्हिडिओ पुन्हा शेअर करत लिहिले की, ‘मी ट्रम्प यांना होर्मुजमधील दोन जहाजांबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्यावर कथितपणे इराणी गनबोट्सने गोळीबार केला होता. मात्र त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मला बाहेर जाण्यास सांगितले.’

ओलिविया रिनाल्डी या CBS न्यूजमध्ये व्हाइट हाऊस रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 2024 च्या अमेरिकन निवडणूक प्रचाराची रिपोर्टिंग केली असून, यापूर्वी त्या सीबीएस इव्हनिंग न्यूज विथ नोरा ओ’डोनेलमध्ये असोसिएट प्रोड्यूसर होत्या. त्यांनी तीन वर्षे नोराह ओ’डॉनेल यांच्यासोबत काम केले असून 60 मिनिट्स आणि CBS न्यूज संडे मॉर्निंग यांसारख्या कार्यक्रमांवरही काम केले आहे.

इराणला करार मान्य करावाच लागेल – ट्रम्प

डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितले की, इराणने संघर्षविरामाचे गंभीर उल्लंघन केले आहे, मात्र तरीही शांतता करार शक्य आहे. त्यांनी म्हटले की, करार होणारच, चांगल्या मार्गाने किंवा कठीण मार्गाने. त्यांनी इराणला चांगली ऑफर दिल्याचा दावा केला आणि जर ती मान्य केली नाही, तर पूल आणि वीज प्रकल्पांवर हल्ले होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...