मोठी बातमी! अमेरिकन तळ उद्ध्वस्त, इराणच्या दाव्याने दुबईत खळबळ, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत

War Update : इराणने दावा केला की, त्यांनी दुबईमधील अमेरिकेची तळे उडवली आहेत. यात अनेक अमेरिकेचे सैनिक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे.

मोठी बातमी! अमेरिकन तळ उद्ध्वस्त, इराणच्या दाव्याने दुबईत खळबळ, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत
Trump War
Image Credit source: Google
| Updated on: Mar 28, 2026 | 9:27 PM

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाला एक महिना पूर्ण झाला आहे. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता इराणने अमेरिकेला मोठा दणका दिला आहे. इराणने दावा केला की, त्यांनी दुबईमधील अमेरिकेची तळे उडवली आहेत. तसनीम न्यूज एजन्सीने सांगितले की, दुबईतील अमेरिकन सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या ठिकाणी 500 हून अधिक अमेरिकन सैनिक होते. या हल्यानंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी खाडी देशांना इशाराही दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ड्रोन आणि मिसाईलने हल्ले

इराणच्या IRGC ने अमेरिकन ठिकाणांवर अचूक ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने सैनिक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसनीमच्या प्रवक्त्याने सांगितले की, या हल्ल्यानंतर दुबईमध्ये अनेक अॅम्ब्युलन्स मृत आणि जखमी अमेरिकन सैनिकांना मदत करताना पहायला मिलाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सैन्याच्या कमांडर्सना समजायला हवे होते की हा प्रदेश अमेरिकन सैनिकांसाठी स्मशानभूमी ठरू शकते. त्यामुळे अमेरिकेकडे शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

शेजारी देशांना गंभीर इशारा

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी खाडी देशांना गंभीर इशारा दिला आहे. पेजेशकियान यांनी म्हटले की, जर खाडी देशांना विकास आणि सुरक्षा हवी असेल, तर त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला आपल्या भूमीचा वापर करून इराणवर हल्ला करण्याची परवानगी देऊ नये. जर इराणच्या पायाभूत सुविधा किंवा आर्थिक केंद्रांवर हल्ला झाला, तर इराण अमेरिका आणि इस्रायलला कठोर प्रत्युत्तर देईल. इराण कधीही पहिला हल्ला करत नाही; मात्र महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही.

अमेरिकेची योजना काय?

समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिका मध्य पूर्वेत 82 वी एअरबॉर्न डिव्हिजन तैनात करण्याचा विचार करत आहे. तसेच अमेरिका खार्ग बेटावर भूदल कारवाईचाही विचार करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे इराणने त्या भागात मायन्स टाकण्यास सुरुवात केली असून अतिरिक्त सैन्य तैनात करण्याबाबत विचार सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे.

 

Follow Us