AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध थांबवण्यासाठी इराणची मोठी अट, सर्वांच्या नजरा अमेरिकेवर, हालचालींना वेग

Iran vs USA : पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र हे युद्ध संपवण्यासाठी इराणने एक मोठी अट ठेवली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

युद्ध थांबवण्यासाठी इराणची मोठी अट, सर्वांच्या नजरा अमेरिकेवर, हालचालींना वेग
Mojtaba and TrumpImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 24, 2026 | 9:06 PM
Share

इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात तणाव निर्माण झाला आहे. अनेक देशांमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. अशातच मध्य पूर्वेतील एक मोठी राजनैतिक घडामोड समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवस इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता इराणचे एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ पाकिस्तानकडे रवाना होणार आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र हे युद्ध संपवण्यासाठी इराणने एक मोठी अट ठेवली आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष हे अमेरिकेच्या निर्णयाकडे लागले आहे.

युद्ध संपवण्यासाठी इराणची मोठी अट

समोर आलेल्या माहितीनुसार इराणने आता अमेरिकेशी थेट चर्चा करण्यापूर्वी एक अट समोर ठेवली आहे. इराणला डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांवर आता अजिबात विश्वास उरलेला नाही, अमेरिकेने त्यांची तीन वेळा फसवणूक केल्याचा इराणचा आरोप आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान सौदी अरेबिया आणि इजिप्त मध्यस्थी करत आहेत. या देशांनी ट्रम्प आपले आश्वासन पाळतील याची खात्री द्यावी, अशी मागणी इराणची मागणी आहे. या हमीनंतरच इराणी प्रतिनिधीमंडळ युद्ध समाप्तीच्या चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लेखी हमीची मागणी

इराणचा असा दावा आहे की, मस्कत, व्हिएन्ना आणि इस्तंबूल येथे झालेल्या मागील चर्चांदरम्यान अमेरिकेने त्यांची तीन वेळा फसवणूक केली. मोजतबा खामेमी यांच्या नेतृत्वाखालील इराणने यावेळी स्पष्ट केले आहे की, थेट चर्चेपूर्वी ठोस आणि लेखी सुरक्षा हमी आवश्यक आहे. IRGC च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणला अमेरिका विश्वासार्ह वाटत नाही. त्यामुळे यावेळी ते थेट चर्चा टाळून पाकिस्तान, इजिप्त आणि कतारसारख्या देशांना संरक्षण कवच म्हणून वापरण्याचा विचार करत आहेत.

चर्चेसाठी इस्लामाबादच का?

इराणने या महत्त्वाच्या चर्चेसाठी पाकिस्तानची निवड केली आहे, कारण त्यांना पाकिस्तानी लष्कर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर मोठा विश्वास आहे. फील्ड मार्शल असीम मुनीर आणि आयएसआय प्रमुखांसोबत होणाऱ्या गुप्त बैठकीत पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि इजिप्त इराणसाठी आवश्यक संरक्षण कवच बनू शकतात का? हे ठरणार आहे. भविष्यात राजनैतिक अपयश आल्यास या देशांनी सुरक्षा जबाबदारी घ्यावी, अशी इराणची अपेक्षा आहे. त्यामुळे इराणने स्पष्ट केले आहे की, मध्यस्थ देशांनी ठोस आणि लेखी हमी दिल्याशिवाय थेट चर्चा सुरू होणार नाही.

Follow Us
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?