AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

F-35 Hit by Iran : जे फायटर जेट रडारलाही सापडत नाही, ते F-35 इराणने कसं उडवलं? अमेरिकेसह सगळ्या डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये खळबळ

F-35 Hit by Iran : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धात काल एक धक्कादायक घटना घडली. अमेरिकेचं सर्वात शक्तीशाली फायटर विमान F-35 इराणने उडवलं. हे कसं शक्य झालय ते समजून घ्या. यामुळे डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

F-35 Hit by Iran : जे फायटर जेट रडारलाही सापडत नाही, ते F-35 इराणने कसं उडवलं? अमेरिकेसह सगळ्या डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये खळबळ
F-35 Hit by Iran
| Updated on: Mar 20, 2026 | 1:31 PM
Share

इराणने जगातील शक्तीशाली मानल्या जाणाऱ्या F-35 फायटर जेटवर अचूक हल्ला केल्याचा दावा केला आहे. जगातील सर्वात महागडं आणि रडारपासून अदृश्य रहाणाऱ्या या फायटर जेटला इराणी मिसाइलने लक्ष्य केलं. F-35 हे जगातील सर्वात सुरक्षित फायटर जेट मानलं जातं. त्या विमानावर हल्ला करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याच्या बातमीने डिफेन्स सेक्टरमध्ये एकच खळबळ उडवली आहे. इराणच्या इस्लामिक गार्ड्स कॉर्प्सनुसार (IRGC) या फायटर जेटला इराणी एअरस्पेसमध्ये एअर डिफेन्स सिस्टिमने हिट केलं. IRGC च्या दाव्यानुसार त्यांनी 125 पेक्षा जास्त अमेरिकी आणि इस्रायली ड्रोन रोखल्यानंतर हा हल्ला केला.

काही रिपोर्टमध्ये आणि इराणी मीडियानुसार या हल्ल्यासाठी इराणने स्वदेशी ‘बावर-373’ एअर डिफेन्स सिस्टिमचा वापर केला. यात पॅसिव सेन्सरचा सुद्धा हात असू शकतो. रडार सिग्नल शिवाय हे सेन्सर विमानाला शोधू शकतात. इराणने या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय. यात विमानाला मिसाइल हिट करत असल्याचा दावा करण्यात आलाय. अमेरिकेने अजूनपर्यंत याची अधिकृत पष्टी केलेली नाही. F-35 ची इमर्जन्सी लँडिंग का झाली? यामागे काही टेक्निक्ल कारण आहे का? ते अजून समजू शकलेलं नाही.

F-35 चं वैशिष्ट्य काय?

F-35 चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते स्टेल्थ आहे. हवेत उडताना अदृश्य असतं.

हे विमान एअर टू एअर डॉगफाईट, एअर टू ग्राऊंड बॉम्बफेक आणि हेरगिरी ही तिन्ही काम करु शकतं.

ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त गतीने 1,931 किमी/ प्रतितास वेगाने हे विमान उडू शकतं.

याय एडवांस सेंसर सूट आणि रडार सिस्टिम आहे, ज्यामुळे पायलट 360 डिग्री व्यू पाहू शकतो.

पायलटची प्रकृती स्थिर

मिशनवर असताना F-35 फायटर जेटला इमर्जन्सी लँडिंग करावी लागलीय हे अमेरिकी सेंट्रल कमांडने मान्य केलय. विमानाने सुरक्षित रित्या लँडिंग केली असून पायलटची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतय. F-35 बाबत इराण जो दावा करतय तसं खरच घडलं असेल तर अमेरिकेसाठी हा मोठा धक्का आहे. कारण अमेरिकेकडून या विमानाचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुरु आहे.

Follow Us
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर