AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Irana Attack Qatar : पाच वर्षांसाठी कतरचा LNG पुरवठा.. वाईट बातमी, भारताचं नाव या देशांच्या लिस्टमध्ये आहे का?

Irana Attack Qatar : मध्य पूर्वेतील परस्परांच्या लष्करी तळांवर होणारे हल्ले आता ऊर्जा युद्धामध्ये बदलले आहेत. इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ला केल्यानंतर वातावरण बिघडून गेलं आहे. एक टेन्शन वाढवणारी बातमी आहे.

Irana Attack Qatar : पाच वर्षांसाठी कतरचा LNG पुरवठा.. वाईट बातमी, भारताचं नाव या देशांच्या लिस्टमध्ये आहे का?
Gas Field
| Updated on: Mar 20, 2026 | 10:16 AM
Share

इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून कतर आणि सौदी अरेबियाच्या तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले. या हल्ल्यामुळे कतरची 17 टक्के LNG निर्यातीची क्षमता बाधित झाली आहे. वार्षिक उत्पन्नात 20 अब्ज डॉलर्सचं नुकसान होणार आहे. कतर एनर्जीचे सीईओ आणि ऊर्ज मंत्री साद अल-काबी यांनी ही माहिती दिलीय. ही अजिबात चांगली बातमी नाहीय. या हल्ल्यामुळे कतरचा पाच वर्षांसाठी एलएनजी पुरवठा विस्काळीत होणार आहे. युरोपियन आणि आशियाई देशांना या प्रकल्पातून एलएनजीचा पुरवठा होतो. यात भारत आणि चीन हे देश सुद्धा आहेत.

“मागच्या काही दिवसात इराणने केलेल्या हल्ल्यामुळे कतरच्या 14 एलएनजी ट्रेन्स पैकी दोन आणि गॅस टू लिक्विड GTL च्या एका प्रकल्पाचं नुकसान झालं आहे. मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, रमजानच्या महिन्यात मुस्लिम बंधु देशाकडून कतर आणि या क्षेत्रातील प्रकल्पांवर असे हल्ले होतील” असं अल काबी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. इस्रायलने गॅस प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर इराणने कतरच्या एलएनजी प्लांटवर हल्ला केला. इराणने कतरच्या रास लफानवर हल्ला केला. हा इराणमधील मोठा LNG प्लांट आहे. त्यामुळे एलएनजी उत्पादन बाधित होणार आहे. “उत्पादन सुरु करण्यासाठी आधी हे हल्ले थांबले पाहिजेत” असं अल काबी यांनी म्हटलं आहे.

दुरुस्तीला किती वर्ष लागतील?

“युद्धामुळे या भागाचं जे नुकसान झालय त्यातून पुन्हा उभं रहायला 10 ते 20 वर्ष लागतील. अनेक लोकांसाठी वास्तव्यासाठी ही सुरक्षित जागा मानली जायची. त्या प्रतिमेला सुद्धा धक्का लागलाय” असं अल काबी म्हणाले. नुकसान झालेल्या एलएनजी प्लांटमध्ये एक्सॉन मोबिल ही अमेरिकेन कंपनी पार्टनर आहे. GTL फॅसिलिटीचं सुद्धा नुकसान झालय. ही दुरुस्ती व्हायला अजून काही वर्ष लागतील. टेक्सास स्थित एक्सॉन मोबिलचा एलएनजी ट्रेन S4 मध्ये 34 टक्के वाटा आहे. S6 मध्ये 30 टक्के वाटा आहे. ट्रेन S4 मुळे इटली, बेल्जियमचा एलएनजी पुरवठा बाधित होईल. S6 चा दक्षिण कोरिया आणि चीनला फटका बसेल.

Follow Us
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या नेत्याचा पराभव करत दणदणीत विजय
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
Nashik Gite Vs Darade Rada | दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही...