AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने होर्मुज खाडी खुली करण्याकरिता ठेवली चक्क ही अट, भारताने लावला डोक्याला हात, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात जग भरडले जात आहे. यादरम्यानच होर्मुज मार्ग बंद आहे. अमेरिकेने होर्मुज मार्ग 48 तासात खुला करण्याकरिता इशारा दिल्यानंतर इराणकडून मोठी अट ठेवण्यात आली. मात्र, त्यानंतर भारताच्या समस्येत वाढ होणार आहे.

इराणने होर्मुज खाडी खुली करण्याकरिता ठेवली चक्क ही अट, भारताने लावला डोक्याला हात, थेट..
Iran Gulf of Hormuz
| Updated on: Apr 06, 2026 | 9:25 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात अनेक घडामोडी घडत आहे. इराणमधून भारताला फोन आला. यादरम्यानच्या स्थितीची चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासाचा वेळ दिला. जर तोपर्यंत इराण कराराकरिता तयार झाला नाही तर मोठे हल्ले केले जातील. अमेरिकेकडून होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणवर दबाव टाकला जात आहे. होर्मुज खाडी खुली करा नाही तर नरकात जा अशाप्रकारचे थेट विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. या युद्धामुळे जग तणावात आहे. जर 48 तासात इराणकडून करार करण्यात आली नाही तर अमेरिका मोठा हल्ला करू शकते. विनाश होणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकेकडून इतकी मोठी धमकी देण्यात आल्यानंतरही इराण मजाक उडवताना दिसत आहे. इराणला धमकी देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी काही अपशब्दांचा वापर केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज खाडी खुली करण्याबद्दल भाष्य केले. त्यावर इराणकडून मोठे विधान करण्यात आले. इराणच्या राष्ट्रपती कार्यालयातील अधिकारी मेहदी तबातबाई यांनी ट्रम्प यांच्या धमक्यांना उत्तर देताना म्हटले की, युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी वाहतूक शुल्काचा काही भाग वापरल्यास आम्ही होर्मुज खाडी खुली करू शकतो.

इराणचे संसद अध्यक्ष गालिबाफ यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर दिले. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, तुमच्या या कृती अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला जिवंत नरकात ओढत आहेत. नेतन्याहूंच्या आदेशांचे पालन करण्याच्या तुमच्या आग्रहामुळे आपला संपूर्ण प्रदेश जळून खाक होईल, लक्षात ठेवा. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना विश्वास आहे की, इराण युद्धबंदी करारासाठी तयार होईल.

यादरम्यान भारताचे टेन्शन वाढले आहे. रशियामुळे भारतात कच्च्या तेलाचे कोणतेही टेन्शन नाही. मात्र, एलपीजीचा तुटवडा भारतात नक्कीच आहे. सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी एक योजना आखली आहे.एलपीजी ग्राहकांना पीएनजीकडे वळवण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले जात आहे. 5 एप्रिल रोजी सरकारने अहवाल दिला, गेल्या महिन्यात अंदाजे 800,000 ग्राहकांनी पीएनजीचा वापर सुरू केला आहे. जर होर्मुज मार्ग लवकर खुला झाला नाही तर भारतासाठी मोठी समस्या नक्कीच बनू शकते.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त