AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘… तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू’, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुनावलं; नेमकं प्रकरण काय?

Supreme Court and Maharashtra Government : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत, तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू असा कठोर इशारा दिला आहे. कोर्टाने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

'... तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू', सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुनावलं; नेमकं प्रकरण काय?
SC angry on Maharashtra Government Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 11, 2026 | 7:12 PM
Share

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत, तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू असा कठोर इशारा दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकार जामीन अर्जांना जोरदार विरोध करते, मात्र फौजदारी खटल्यांची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत नाही. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर एका परदेशी नागरिकाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायालयाने हे विधान केले आहे.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले, ‘महाराष्ट्रातील अशा प्रकारची प्रकरणे दररोज येत आहेत. तुम्ही जामीनाला जोरदार विरोध करता, पण खटल्यांची सुनावणी वेगाने होण्यासाठी कोणतीही प्रभावी पावले उचलत नाही. जेव्हा आम्ही प्रकरणाची तपासणी करतो, तेव्हा पुरावे कमकुवत असल्याचे दिसते. त्यामुळे आम्ही तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू.’

चार वर्षांपासून तुरुंगात, तरी सुनावणी रखडली

अपहरण आणि खून प्रकरणातील एका आरोपीने न्यायालयाला सांगितले की, तो गेली चार वर्षे तुरुंगात असून त्याचा खटला ट्रायल कोर्टात 86 वेळा लिस्टेड झाला होता. त्याने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्याला 53 वेळा न्यायालयातच हजर करण्यात आले नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने ही बाब महाराष्ट्र सरकारची गंभीर चूक असल्याचे म्हटले आहे.

जलद सुनावणी हा आरोपीचा मूलभूत अधिकार

आरोपीला जलदगतीने खटल्याची सुनावणी मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचा उल्लेख करत खंडपीठाने म्हटले, ‘आम्हाला याची लाज वाटते. चार वर्षांत 34 साक्षीदारांपैकी केवळ दोन जणांचीच साक्ष नोंदवली गेली आहे. ही बाब काही काळापासून न्यायालयाला अस्वस्थ करत आहे. राज्य सरकार जामीन अर्जांना विरोध करत असेल, तर खटल्याची सुनावणी सुरळीत आणि वेगाने पार पाडण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.’

महाराष्ट्र सरकारची भूमिका काय?

महाराष्ट्र सरकारच्या वतीने हजर असलेल्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, आता राज्य सरकार प्रत्येक सुनावणीच्या दिवशी सर्व आरोपींना ट्रायल कोर्टात हजर करत आहे.

न्यायालयाचे निर्देश काय?

सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना फौजदारी खटल्यांची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ठोस धोरण तयार करण्याची गरज असल्याचे नमूद केले. न्यायालयाने निर्देश दिले की, दर आठवड्याला किमान चार साक्षीदारांची साक्ष नोंदवावी आणि त्याची नोंद ट्रायल कोर्टासमोर सादर करावी. भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे समोर आल्यास याचप्रमाणे कठोर आदेश दिले जातील, असा इशाराही न्यायालयाने दिला.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?