AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीनगरात भल्या पहाटे बाबा डॉनच्या घरावर रेड, करोडो रुपये, बंदुका, पिस्तुल कसे पकडले? पोलिसांनी A टू Z सांगितलं!

झडतीदरम्यान दोन पिस्तुले, मॅगझिनसह रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली. एकूण 6,350 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यामध्ये 12 बोरची 632 जिवंत काडतुसे, 7.65 एमएमची 1,878 काडतुसे आणि 0.22 बोरची 3,840 जिवंत काडतुसे आहेत.

संभाजीनगरात भल्या पहाटे बाबा डॉनच्या घरावर रेड, करोडो रुपये, बंदुका, पिस्तुल कसे पकडले? पोलिसांनी A टू Z सांगितलं!
chhatrapati sambhajinagar police raidImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 11, 2026 | 6:55 PM
Share

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर हे मोठं घडामोडींचं शहर आहे. या शहरात कधी काय होईल हे सांगता येत नाही. 90 च्या दहशकात मिटमिटा आणि सिटी चौकात मोठा धाक असणाऱ्या बाबा फरजान डॉनची मोठी दहशत होती. याच डॉनच्या घरी पोलिसांनी 10 जुलैच्या भल्या पहाटे छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी 5 कोटींची रोकड 21 लाखांचे सोन्याचे दागिने, 8 लाखांची चांदी, 4 रायफल, सुमारे 500 जिवंत काडतुसे असा मोठा ऐवज ताब्यात घेतला आहे. दरम्यान, ही कारवाई झाल्यानंतर संभाजीनगरात मोठा घात घडवून आणण्याचा बेत होता का? असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शशकांत सातव यांनी छापेमारीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच पुढची योजना काय असेल, याविषयीही त्यांनी माहिती दिली.

रोख रक्कम आणि शस्त्रसाठा जप्त

शशिकांत सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलीस आयुक्तांना गोपनीय माहिती मिळाली होती की, छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि शस्त्रसाठा ठेवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. झाडातीवेळी घरात शीला साळवे नावाची महिला उपस्थित होती. दोन पंचांसमक्ष घराची झडती घेण्यात आली. झाडाझतीदरम्यान 5 कोटी 26 लाख 29 हजार रुपयांची रोख रक्कम, सहा वेपन, तलवारी, चाकू, गुप्ती तसेच सोने-चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला.

बाबा फरजान यांच्या घरावर छापा

तसेच, या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घर बाबा फरजान यांचं होतं. त्यांचे मागील महिन्यात मधुमेहाच्या आजारामुळे निधन झाले आहे. 1980 ते 1990 या कालावधीत ते कामगार युनियनचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली, असे शशिकांत सातव यांनी सांगितले.

एकूण 6,350 जिवंत काडतुसे जप्त

झडतीदरम्यान दोन पिस्तुले, मॅगझिनसह रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली. एकूण 6,350 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यामध्ये 12 बोरची 632 जिवंत काडतुसे, 7.65 एमएमची 1,878 काडतुसे आणि 0.22 बोरची 3,840 जिवंत काडतुसे आहेत. ही शस्त्रे आणि काडतुसे कोठून आणण्यात आली, त्यांचा वापर झाला आहे का, तसेच त्यांचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई 10 तारखेला करण्यात आली असून, त्याच रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी करत असून, आर्मीकडून काही आम्हाला विचारात झाली तर त्यांना आम्ही माहिती देऊ, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?