AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : इराणमध्ये जिकडे-तिकडे मोसाद, खामेनेईवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ, Inside Story

Explained : इराणमध्ये मोसादची पोहोच पाहून सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेईच्या प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. इराणने जो विचार केला नव्हता, त्या पलीकडच्या गोष्टी मोसादने तिथे करुन ठेवल्या आहेत. इराणमध्ये मोसादच जे नेटवर्क आहे, त्याची Inside Story वाचा.

Explained : इराणमध्ये जिकडे-तिकडे मोसाद, खामेनेईवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ, Inside Story
Iran
| Updated on: Jun 27, 2025 | 11:52 AM
Share

इराण-इस्रायल युद्ध आता थांबलं आहे. पण इस्रायलच्या शत्रुंच्या यादीत इराण सर्वात वरच्या स्थानावर आहे. इस्रायलकडून इराणवर आता बॉम्बफेक होणार नाही. पण त्यांच्यावर नजर ठेवण्याच अभियान थांबणार नाही. इस्रायलची गुप्त मिशन इराणमध्ये सुरु राहतील. मोसादच्या प्रमुखाने याची घोषणा करताना इराणला खुलं आव्हान दिलय. नुकत्याच संपलेल्या युद्धात मोसादमुळेच इस्रायल प्रत्येक आघाडीवर इराणच्या दोन पावलं पुढे होता, असं मोसाद चीफने सांगितलं. आपल्या देशात मोसादच इतकं मजबूत नेटवर्क आहे, याचा इराणला अंदाजही नव्हता. इराणच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले झाल्यानंतर सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेईला मोठा धक्का बसला. अचानक सीनियर कमांडर्स मारले गेले. वैज्ञानिकांची हत्या झाली.

मिसाइल लॉन्चर्स उद्धवस्त झाले. इराणच्या आतमध्ये उडणाऱ्या ड्रोन्सनी त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट केली. त्यामुळे इराण एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढत होता. एक प्रत्यक्ष लढाई आणि दुसरी इस्रायली हेरांच्या खात्म्याची. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकेच्या सीआयए विरोधात अभियान सुरु असल्याचा इराणने दावा केलाय. हे युद्ध अजूनही सुरु आहे आणि भविष्यातही सुरु राहील. कारण युद्धविरामानंतर मोसाद आणि इराणच्या गुप्तचर संस्थेमध्ये लढाई सुरुच आहे. मोसादचे हेड डेविड बर्निया यांनी आपल्या टीमच कौतुक केलं. इराणमधील ऑपरेशनच यश अकल्पनीय असल्याच त्यांनी सांगितलं.

इराणच्या गुप्तचर संस्थेच नाव काय?

मोसाद प्रमुख जे बोललेत, ते खामेनेई आणि इराणच्या गुप्तचर यंत्रणेसाठी एक मोठ आव्हान आहे. मोसाद प्रमुखांनी आपल्या एजेंट्ससाठी इराण एक सुरक्षित जागा असल्याच म्हटलं आहे. याचा अर्थ मोसादच नेटवर्क संपवण्याची इराणमध्ये कुवत नाही. VAAJA म्हणजे वाजा हे इराणच्या गुप्तचर संस्थेच नाव आहे. मोसादची जी रणनिती आहे, त्यानुसार जेव्हा वाटेल तेव्हा इराणच्या कुठल्याही कोपऱ्यात ऑपरेशन करु शकतात.

युद्धाविरामानंतर जोरात छापेमारी

मोसादच इराणमधील नेटवर्क शोधण्यासाठी इराणची गुप्तचर यंत्रणा वाजाने पूर्ण ताकद लावली आहे. अटक सत्र सुरु आहे. इराणमध्ये आतापर्यंत जवळपास 700 जणांना अटक झाली आहे. तिघांना फाशी देण्यात आली आहे. इराणमध्ये युद्धाविरामानंतर जोरात छापेमारी सुरु आहे. इराणमधून जे रिपोर्ट येत आहेत, त्यानुसार मोसादशी संबंधित लोकांना पकडल्यानंतर अनेक पुरावे मिळाले आहेत.

CIA चा रोल काय?

इस्रायलने एक व्हिडिओ पोस्ट करुन इराणच्या आतमध्ये कमांडो कारवाई केल्याचा दावा केला आहे. अशाच प्रकारे इराणमध्ये बॅलेस्टिक मिसाइल्सचे कारखाने नष्ट करण्यात आले, एअर डिफेन्स सिस्टिमला लक्ष्य केल्याच म्हटलं आहे. मोसादच्या प्रमुखांनी अमेरिकी एजन्सी CIA चे आभार मानले. कारण इराणमध्ये ऑपरेशन राबवण्यासाठी CIA ने मोसादची मदत केली होती. त्याशिवया IDF ने सुद्धा आपल्या इंटेलिजन्सने इस्रायलमध्ये ऑपरेशन चालवलं.

इराणचा प्रत्येक अधिकारी कसा इस्रायलच्या रेंजमध्ये?

जे मोसादसाठी काम करतायत त्यांच्या मनात भिती बसावी म्हणून इराणमध्ये एक नवीन कायदा आणण्याची तयारी सुरु आहे. इराणमध्ये हेरहिरी आणि देशद्रोह करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. मोसादप्रमाणे इस्रायलमध्ये VAAJA च नेटवर्क वाढवण्याचा सुद्धा इराणचा उद्देश आहे. इराणच्या प्रत्येक विभागात मोसादचे एजंट्स असल्याचा अनेक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय. सीनियर पदांवर मोसादचे हेर बसले आहेत. इराणच्या सैन्यातही मोसादने घुसखोरी केलीय. महिला हेरांच्या माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यावर नजर आहे.

इराणच्या आत सिक्रेट फॅक्टरीज

मोसादच हेच नेटवर्क कमी करण्याचा वाजाचा प्रयत्न आहे. मागच्या आठवड्यात छापेमारीच्या अभियानादरम्यान खुलासा झालेला की, तस्करीच्या माध्यमातून ड्रोनचे वेगवेगळे भाग इराणमध्ये आणले. इराणच्या आत मोसाद एजंट्सच्या अनेक सिक्रेट फॅक्टरीज आहेत. म्हणून इराणची नजर आता अशा तस्करी मार्गांवर असेल. इराणमध्ये प्रत्येक छोट्या-मोठ्या फॅक्टरीची डिटेल काढली जात आहे.

यापुढे इराणला दोन आघाड्यांवर लढायचय

इराणमध्ये वाहनांची विक्री आणि भाड्यावर देण्यासाठी सुद्धा कठोर नियम बनवले जात आहेत. निश्चित मोसाद इराणच्या गुप्तचर यंत्रणेपेक्षा दोन पावलं पुढे आहे. पण आता इराणची गुप्तचर संस्था VAJA सुद्धा आपली ताकद वाढवत आहे. VAJA ने इस्रायलमध्ये नेटवर्क वाढवण्यावर जोर दिला आहे. VAJA सुद्धा मोसादप्रमाणे सरकारी विभागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. VAJA च्या स्लीपर सेलला एक्टिव केल्यानंतर त्यांना आता मिशन सोपवले जात आहेत. सैन्य आणि सिक्रेट ठिकाणांची सुरक्षा हे इराणसमोरच मुख्य आव्हान आहे. इराणने आतापर्यंत आपल्या शत्रुंशी लढण्याची तयारी केली होती. पण इराणला आता जाणीव झालीय की, त्यांना आता आपल्या देशातील हेरांचा मुकाबला करायचा आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.