AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचे क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यासाठी इस्त्रायलचा रोजचा खर्च किती? किंमत ऐकून बसले झटका

iran israel war: इस्त्रायल मल्टी लेअर मिसाईल डिफेन्स सिस्टमवर मोठा खर्च करत आहे. त्यात तीन प्रमुख इंटरसेप्टर प्रणालीचा सहभाग आहे. हे युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास इस्त्रायलच्या आर्थिक परिस्थितीवरच परिणाम होणार आहे.

इराणचे क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यासाठी इस्त्रायलचा रोजचा खर्च किती? किंमत ऐकून बसले झटका
| Updated on: Jun 19, 2025 | 8:33 AM
Share

iran israel war: इराण आणि इस्त्रायल यांच्यात सातव्या दिवशीही भीषण युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले जात आहे. या दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्त्रायल आपल्या सुरक्षेसाठी सर्वात महागडी सशास्त्रे वापरत आहे. इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले रोखण्यासाठी इस्त्रायल प्रत्येक रात्री कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. इस्त्रायलच्या डिफेंसिव्ह इंटरसेप्टरची किंमत खूप जास्त आहे. इस्त्रायल इराणचे हल्ले रोखण्यासाठी किती खर्च करत आहे, जाणून घेऊ या.

कोणत्या प्रणालीचा वापर

इस्त्रायल मल्टी लेअर मिसाईल डिफेन्स सिस्टमवर मोठा खर्च करत आहे. त्यात तीन प्रमुख इंटरसेप्टर प्रणालीचा सहभाग आहे. एरो सिस्टम, डेव्हिड्स स्लिंग आणि आयरन डोम यांचा समावेश आहे. या सिस्टम दीर्घ टप्प्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या बचावासाठी तैनात केल्या आहेत. उंचीवर असलेल्या क्षेपणास्त्र हे अवकाशात नष्ट करते.

  • एका डिफेन्स सिस्टमची किंमत 20 लाख डॉलर ते 30 लाख डॉलर (16.7 कोटी ते 25 कोटी रुपये). आता इस्त्रायलकडे असणारा एरो सिस्टमचा साठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे इस्त्रायलच्या संरक्षणासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.
  • Davids Sling ही प्रणाली लांब पल्याचे क्षेपणास्त्र, क्रूझ क्षेपणास्त्र रोखण्यासाठी वापरली जाते. या प्रणालीची किंमत 10 लाख डॉलरपेक्षा (जवळपास 8.3 कोटी रुपये) जास्त आहे.
  • Iron Dome ही प्राणाली जवळचे हल्ले इंटरसेप्ट करण्यासाठी वापरली जाते. त्याची किंमत 20,000 ते 100,000 डॉलर (जवळपास 16.7 लाख के 83 लाख रुपये) आहे.

दुहेरी संकटाचा सामना

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेला या संकटाची माहिती अनेक महिन्यांपूर्वी मिळाली. आता युद्धाची परिस्थिती पाहिल्यावर इस्त्रायलला आपल्या डिफेंस इंटरसेप्टर्सचा खर्च आणि स्टॉक अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. हे युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास इस्त्रायलच्या आर्थिक परिस्थितीवरच परिणाम होणार नाही तर त्यांची संरक्षण प्रणालीही धोक्यात येऊ शकते, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे आता इस्त्रायलला अमेरिकेच्या पाठिंब्याची सर्वाधिक गरज आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.