AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलने हवेतून निशाणा साधला, खामेनींच्या टॉपच्या कमांडरला उडवलं, आता इराण काय करणार?

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध चांगलेच पेटले आहे. आता इस्रायलने इराणवर मोठे हले्ले केले असून यात इराणचे बडे लष्करी अधिकारी मारले गेले आहेत.

इस्रायलने हवेतून निशाणा साधला, खामेनींच्या टॉपच्या कमांडरला उडवलं, आता इराण काय करणार?
| Updated on: Jun 21, 2025 | 5:43 PM
Share

Israel Iran War Update : मध्य पूर्वेची स्थिती सध्या चिंताजनक झाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे हा संपूर्ण भाग दहशतीच्या सावटाखाली आहे. 13 जून रोजी इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला सुरूवात झाली. आता हे दोन्ही देश एकमेकांच्या महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्र, बॉम्बगोळे याचा अशरश: वर्षाव करत आहेत. दरम्यान, गेल्या 12 तासांत इस्रायलने इराणवर मोठे हल्ले केले आहेत. हे हल्ल इस्फहान अणूउर्जा प्रकल्पाच्या भागात करण्यात आले आहेत. सोबतच इस्रायलने इराणच्या गुप्तचर संस्थेच्या तीन वरिष्ठ सौन्य अधिकाऱ्यांनाही मारलं असून एकूण 12 सैनिकांना संपवलं आहे. इस्रायलच्या या हल्ल्यांना आता इराणदेखील जशास तसं उत्तर देण्याची शक्यता आहे.

कमांडरला केलं ठार…

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने आपल्या एक्स खात्यावर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. इस्रायलने इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या (IRGC) कुद्स फोर्सच्या वेपन्स ट्रान्सफर यूनिटचे (यूनिट 190) कमांडर बेहनाम शाहरियारी यांना ठार केलं आहे. पश्चिमी इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात बेहनाम मृत्युमुखी पडल्याचे इस्रायल डिफेन्स फोर्सेसने सांगितले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून…

शहरियारी हे त्यांच्या वाहनातून प्रवास करत होते. ते पश्चिम इराणमध्ये जात होते. आपल्या मध्य पूर्वेतील सहकाऱ्यांना शस्त्र पुरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. इस्रायलविरोधात लढा उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते कथित दहशतवादी संघटनांना शस्त्र पुरवत होते, असा दावा केला जातो. हिजबुल्लाह, हौथी, हमास यासारख्या संघटनांसोबत ते काम करत होते, असंही सांगितलं जातं. शाहरियारी यांच्यामार्फत या संघटनांना क्षेपणास्त्र, रॉकेट्स पुरवले जायचे, असा इस्रायलचा दावा आहे.

इस्रायलविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी…

इस्रायलने सांगितल्यानुसार नुकत्याच केलेल्या हल्ल्यांत इराणचे वरिष्ठ कमांडर सईद इजादी यांनाही मारण्यात आलंय. इस्रायलला हरवण्यासाठी इजादी यांच्याकडून योजना आखली जात होती. इजादी हे कुद्स फोर्सचे कमांडर होते. ते इराणचे सरकार तसेच हमास यांच्यातील मुख्य समन्वयक होते. इस्रायलविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी इराण हमासला आर्थिक पुरवठा करायचे. या आर्थिर रसद पुरण्यात इजादी यांची महत्त्वाची भूमिका होती, असे इस्रायलचे मत आहे.

इराणमध्ये 650 पेक्षा अधिक लोक मारले गेले

इस्रायलने केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या वायूसेनेने आयआरजीसी सेकंड यूएव्ही ब्रिगेडचे कमांडर अमीनपूर जौदकी यांनाही संपवलं आहे. या युद्धात आतापर्यंत इराणमध्ये 650 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2000 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे इस्रायलचे आतापर्यंत 25 सामान्य लोक मारले गेले आहेत.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.