फक्त एक महिना बाकी…, इराण करणार मोठा धमाका, अमेरिका-इस्रायल चिंतेत

इराण आणि इस्रायल युद्धानंतर अमेरिकेने इराणचा अणुकार्यक्रम संपवल्याचा दावा केला आहे. मात्र आता एका महिन्यात इराण कमबॅक करण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

फक्त एक महिना बाकी..., इराण करणार मोठा धमाका, अमेरिका-इस्रायल चिंतेत
donald trump iran
| Updated on: Jun 29, 2025 | 5:03 PM

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबल्यानंतर आता दोन्ही देश सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या युद्धानंतर अमेरिकेने इराणचा अणुकार्यक्रम संपवल्याचा दावा केला आहे, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे किती नुकसान झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही. आता IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) ने एक विधान केले आहे. यात इराणच्या युरेनियम निर्माण करण्याच्या क्षमतेबाबत खुलासा करण्यात आला आहे.

अमेरिका-इस्रायल चिंतेत

अमेरिकेने इराणचा अणुकार्यक्रम संपवण्याचे आमचा हेतू असल्याचे विधान केले होते, त्यामुळे अनेरिकेने इराणच्या अनुकेंद्रांवर हल्लाही केला होता. मात्र आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या अनुप्रकल्पांचे नुकसान झाले होते, मात्र इराण महिनाभरात युरेनियमचे उत्पादन पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलची चिंता वाढली आहे.

IAEA चे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी सांगितले की, “इराण काही महिन्यांत युरेनियम तयार करू शकेल. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे प्रकल्पांचे गंभीर नुकसान झाले आहे, परंतु ते प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले नाहीत. इराणकडे औद्योगिक आणि तांत्रिक क्षमता आहे. त्यामुळे हा देश पुन्हा युरेनियमचे उत्पादन सुरु करू शकतो.

अमेरिका इराणवर पुन्हा हल्ला करणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की, इराणने पुन्हा अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा हल्ला करु. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने IAEA सोबतचा करार रद्द केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी स्पष्ट केले आहे की, इराण आपला युरेनियम आणि अनुकार्यक्रम सुरू ठेवणार आहे.इराणने आतापर्यंत असा दावा केला आहे की, आमचा अणुकार्यक्रम शस्त्रांसाठी नाही तर नागरी वापरासाठी आहे. मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर, अनेक इराणी खासदारांनी, देशाचे संरक्षण करण्यासाठी अण्वस्त्रे बनवणे आवश्यक आहे अशी मागणी केली आहे.