इराण धावला भारताच्या मदतीला, जग पाहतच राहिले, थेट मोठा निर्णय घेत भारताला..
इराण आणि अमेरिका युद्धात जगाची पार वाट लागली. जवळपास सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होताना दिसतोय. होर्मुज खाडी 12 आठवड्यांपासून ठप्प आहे. यादरम्यानच भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून होर्मुज खाडीत तणाव आहे. इराण आणि अमेरिका युद्धात इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. इराण अमेरिका आणि अमेरिकेचे समर्थन करणाऱ्या जहाजांना सुरक्षित रस्ता देत नव्हते. यादरम्यान अमेरिकेनेही इराणजवळ मोठी नाकेबंदी केली. ज्याने तणाव अधिकच वाढला. होर्मुज खाडी ठप्प आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. कच्चे तेल भारतात येऊ शकत नाही. भारतासह अनेक देशांमध्ये ऊर्जेचे संकट आहे. आता नुकताच होर्मुज खाडीतून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येत आहे. होर्मुज खाडी सुरक्षित पार करून एक टँकर भारताच्या दिशेने रवाना झाले. भारतात कच्च्या तेलाची टंचाई असतानाच या जहाजाने होर्मुज खाडी पार केली. ही अत्यंत दिलासादायक बातमी म्हणावी लागणार आहे. पर्शियन आखातातील सध्याचा तणाव आणि इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवर टाकलेला सततचा दबाव या पार्श्वभूमीत ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.
होर्मुज खाडीत तणाव असल्याने भारतात तेलाचा तुटवडा निर्माण होत आहे. इराकी कच्चे तेल घेऊन एक सुएझमॅक्स टँकर भारताच्या दिशेने येत आहे. जहाजाच्या ट्रॅकिंग डेटानुसार, कार्लोस नावाच्या टँकरने होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून ओमानच्या आखातात प्रवेश केला आहे. अरबी समुद्रमार्गे भारताच्या दिशेने येत आहे. या ऊर्जा संकटाच्या काळात भारतासाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे.
काहीसा दिलासा भारताला मिळणार आहे. इराणजवळ अमेरिकेची मोठी नाकेबंदी आहे. इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू दिले जात नाही. ब्लूमबर्गने संकलित केलेल्या जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
शनिवार सकाळपर्यंत परिस्थितीत थोडी सुधारणा झाली. सामुद्रधुनीतून सहा जहाजे प्रवास करत होती. इराण आणि अमेरिका युद्धाला 12 आठवडे पूर्ण झालीत. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. होर्मुज खाडीत तणाव आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचे होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली आहे. दोन दिवसांपूर्वीच होर्मुज खाडीत एक भारतीय जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. ज्यानंतर भारताने थेट मोठा इशारा दिला.