अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन….

इराणने अखेर ४८ तासांनी इस्रायल आणि अमेरिकेशी आपला बदला घेतला आहे. २ दिवसांपूर्वी इराणच्या एका जहाजांवर हल्ला झाला होता. त्याचा वचपा आता इराणने काढला आहे.

अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन....
hormuz strait
| Updated on: Apr 22, 2026 | 6:27 PM

इराणने अमेरिकेचा बदला अखेर घेतला आहे. इराणने ४८ तासानंतर होर्मुझमध्ये त्याच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित तीन जहाजांवर हल्ला करुन त्यांना आपल्या ताब्यात घेतले आहे. इराणच्या माध्यमानुसार एका जहाजावर ग्रीक, एकावर लायबेरिया आणि एकावर पनामाचा झेंडा लावला होता. इराणचे म्हणणे आहे की या जहाजांना होर्मुझच्या नियमांचे उल्लंघन केले होते म्हणून त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

या आधी रविवार २० एप्रिल रोजी इराणच्या एका जहाजावर अमेरिकन सैन्याने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने या जहाजाला जप्त केले होते. अमेरिकन मीडियाच्या बातमीनुसार जहाजावर चीनवरुन मिसाईल बनवण्याचे सामान लादले होते. सेंटकॉमने या जहाजाला अजूनही आपल्या ताब्यात ठेवले आहे.

होर्मुझमध्ये इराणने कसा घेतला बदला ?

मरीन ट्रॅफीकच्या मते इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने नौकेद्वारा ओमानच्या जवळ दोन जहाजांना घेरले. या जहाजांवर आधी फायरिंग करण्यात आली आणि नंतर त्यांना ताब्यात घेतले गेले. यानंतर होर्मुझच्या जवळ ग्रीकच्या एका आणखी जहाजाला इराणे जप्त करीत आपल्या ताब्यात घेतले आहे.

या जहाजांवर कोणता माल लादला होता या संदर्भात कोणतीही माहिती आतापर्यंत मिळालेली नाही. सरकारी निवेदनात या जहाजांचे कनेक्शन ज्यू सरकारशी जोडण्यात आले आहे.

ज्या जहाजांना इराणने त्यांच्या ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे MSC- FRANCESCA आणि EPAMINODES आहे. तिसऱ्या जहाजाच्या संदर्भात जास्त माहिती देण्यात आलेली नाही.

होर्मुझ संदर्भात १२ प्वॉईंटचा प्लान –

इराणने बुधवारी संसदेत १२ मुद्यांचा एक प्लान सादर केला आहे. या प्लानवर संसदेची मोहर लागताच तो अमलात आणण्याचे सांगण्यात आले आहे. या अंतर्गत होर्मुझ मध्ये कोणत्याही इस्रायली जहाजाला प्रवेश दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांचे मित्र देशाच्या जहाजावर देखील इराणने एक्शन घेणार असे म्हटले आहे.
इराणचे म्हणणे आहे की जो पण देश फारसची खाडीच्या अस्तित्वाला मानणार नाही त्याचे जहाजांना देखील होर्मुझ पार करु दिले जाणार नाही. इराणने होर्मुझमध्ये इराणी रियालद्वारा टोल घेण्याचाही इरादा व्यक्त केला आहे.

इराणच्या संसदेत सादर केलेल्या बिलाच्या मते जो कोणी होर्मुझच्या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्या जहाजांना आधी जप्त केले जाईल. त्यानंतर त्यावरी मालाच्या किंमतीच्या २० टक्के रक्कम दंड म्हणून केली जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us