AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शामियाना सज्ज, यजमानही तयार …परंतू पाहुण्यांचा पत्ता नाही ! इस्लामाबाद टॉक्सची अवस्था

इस्लामाबादमध्ये चर्चेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त कडक असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र ज्यांच्याशी चर्चा करायची आहे तो इराणचा या चर्चेला येणार की नाही याचा थांगपत्ता नसल्याने जेवण तयार आहे पण वऱ्हाडीच आले नाहीत अशी पाकिस्तानची अवस्था होणार का याकडे लक्ष लागले आहे.

शामियाना सज्ज, यजमानही तयार ...परंतू पाहुण्यांचा पत्ता नाही ! इस्लामाबाद टॉक्सची अवस्था
islamabad talk
| Updated on: Apr 22, 2026 | 10:11 AM
Share

पाकिस्तान नेहमीच असा देश मानला जातो की जो संकटात संधी शोधत असतो. यावेळी पाकिस्तानसाठी एक मोठे व्यासपीठ देखील आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणचा संघर्ष सुरु आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझवरील धोका आणि इंधना संकटासारख्या चिंतेत जग अडकले असताना दुसरीकडे पाकिस्तानने यात एण्ट्री मारत आपण हा संघर्ष सोडवणार असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांचा सीजफायर देखील झाला आहे. परंतू एक्सपर्ट्सने आधीच इशारा दिला आहे की शांतता काही दिवसांची आहे. तरीही इस्लामाबादचाच आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. असे वाटत आहे की जगातील सर्वात अवघड कोड्याचे उत्तर त्यांच्याकडेच आहे.

जमीनीवरील नजारा काही कमी रंजक नाही. इस्लामाबादमध्ये सुरक्षा अशी आहे की सर्व सामान्य लोक विचार करत आहे बैठक आहे की मोहिम ? Geo News आणि Dawn सारखे पाकची वृत्तपत्रातील बातम्यांनुसार रेड झोनची सक्त वाढवली आहे. पोलिस आणि रेंजर तैनात केली आहे. एंट्री- एक्झिटवर कठोर टेहळणी आहे. या बंदोबस्ताला पाहून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे की रिकामे रस्ते, कमी केलेली वाहतूक पाहून लोक म्हणत आहेत की ही शांतता चर्चा आहे की ट्रेलर ऑफ लॉकडाऊन ?

इराण सामील होणार का ?

या कहाणीला दुसरा पैलू देखील आहे. एकीकडे इस्लामाबादमध्ये बातचीत तयारी सुरु आहे. आणि बातमी अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि जे.डी.व्हान्स सारखी मोठ्या हस्ती बैठकीला येऊ शकतात. मात्र, दुसरीकडे ज्या देशाशी बोलणी करायची आहेत. तो इराणच यात सामील होण्याच्या मूडमध्ये दिसत नाही.

इराणच्या या निर्णयामागे सर्वात मोठे कारण विश्वासार्हतेची कमतरता म्हटले जात आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या अलिकडच्या वक्तव्यात म्हटले आहे की अमेरिकन पक्षाच्या वतीने कथित संघर्ष विरामाचे उल्लंघन खास करुन इराणी जहाजाशी संबंधित घटनाक्रमाने संपूर्ण माहोलला प्रभावित केले आहे. यामुळे न केवळ अमेरिकेवर नव्हे तर या संपूर्ण प्रक्रियेवरील इराणचा विश्वास कमी झाला आहे.

अशा वातावरणात तेहराण सध्या कोणत्याही नवीन बैठकीत सामील होण्यापासून परावृत्त होत आहे. जोपर्यंत इराणला हे पटत नाही की बातचीत निष्पक्ष आणि गंभीर पद्धतीने पुढे वाढवेल, तोपर्यंत इराणच्या सामील होण्याची शक्यता खूपच कमी मानली जात आहे. हेच कारण आहे की इस्लामाबादची हा शांततेचा प्रयत्न सुरु होण्याच्या आधीच अडचणीत सापडला आहे.

आता कहानीचा असली ट्विस्ट हाच येतो आहे. जेव्हा पाकिस्तान शांततेची बोलणी होण्यासाठी व्यासपीठ सजवत असताना त्याच दरम्यान सौदी अरबने ३ अब्ज डॉलरचे पॅकेजही पूर्ण झाले आहे. आधी २ अब्ज, नंतर १ अब्ज, कागदोपत्री ही जुनी डील आहे. परंतू टायमिंग अशी आहे की कोणीही विचार करण्यास मजबूर होईल की पाकिस्तान हे काय करत आहे.

पाकिस्तानचा हा खेळ आहे

त्यामुळे ही कहाणी केवळ पीस एफर्ट रहात नाही. डिप्लोमॅटिक पोझिशनिंग बनते. एकीकडे पाकिस्तान स्वत:ला मध्यस्थ म्हणून सादर करत आहेत. जसे त्याच्या शिवाय जगात शांतता अपूर्ण आहे. आणि दुसरीकडे त्याला आर्थिक आघाडीवर दिलासाही मिळत आहे. तज्ज्ञाच्या मते ही शांतता बैठक नाही तर ‘पोझिशनिंग गेम’ आहे. जेथे दिसणे तेवढेच गरजचे जेवढे करणे..

मजेशीर गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील लोक या शोला मोठ्या लक्षपूर्वक पाहात आहेत. सोशल मीडियावर यावर ट्रोलिंग सुरु आहे की तयारी पूर्ण आहे, परंतू पाहुणे येत नाहीएत. तर काही लोक यास रिकाम्या खुर्च्यांची डिप्लोमसी म्हणत आहेत. म्हणजे व्यासपीठ सजले आहे. शामियाना लागला आहे. परंतू पाहुणे काही येत नाहीएत…

इस्लामाबाद येथे एक साथ दोन कहाण्या चालू आहेत. एक जेथे पाकिस्तान स्वत:ला शांततेचा सूत्रधार दाखवत आहेत. दुसरीकडे जेथे तोच देश या निमित्ताने आपला राजकीय प्रभाव आणि आर्थिक सामर्थ्य दोन्ही वाढवण्यासाठी या संधीचा उपयोग करीत असल्याचे दिसते. ही ‘शांतता मोहीम’ आहे की ‘पोजिशनिंग योजना’, हे ठरवणे कदाचित, अजून सुरूही न झालेल्या या चर्चेच्या निकालाएवढेच कठीण आहे. त्यामुळे, प्रश्न निर्माण होतो: पाकिस्तानला खरोखरच शांतता हवी आहे का?

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल