AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणवरील ती कारवाई अमेरिकेला पडू शकते महागात, इराणची थेट धाव, काही तासातच..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मात्र, अमेरिकेने नाकेबंदी हटवण्यास नकार दिला. आमची नाकेबंदी कायम राहणार असल्याची भूमिका अमेेरिकेने कायम ठेवली. मात्र, इराणकडून मोठी धमकी देण्यात आली.

मोठी बातमी! इराणवरील ती कारवाई अमेरिकेला पडू शकते महागात, इराणची थेट धाव, काही तासातच..
United Nations
| Updated on: Apr 22, 2026 | 10:57 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. यामध्येच इराणकडून अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीचा विरोध केला जात आहे. नाकेबंदी हटवण्याची मागणी केली जात आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे एकही जहाज बंदरातून बाहेर पडू शकत नाही. अमेरिकेची नाकेबंदी असताना इराणी जहाज तुस्का जात असताना अमेरिकेने त्याच्यावर मोठा हल्ला करत आपल्या ताब्यात घेतले. या घटनेनंतर इराणकडून संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी शांतता करार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यापासून दूर राहण्याचा निर्णय इराणकडून घेण्यात आला. होर्मुज खाडीत करण्यात आलेल्या नाकेबंदीनंतर बैठकीस बसणे शक्य नसल्याचे इराणकडून स्पष्ट करण्यात आले. यादरम्यान अमेरिकेने शस्त्रसंधीची घोषणा केली. अमेरिकेने केलेल्या शस्त्रसंधीमागे काहीतरी मोठा कट असल्याची शंका इराणकडून उपस्थित केली जात आहे.

यादरम्यानच आता इराण अमेरिकेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. अमेरिकेने इराणचे तुस्का जहाज ताब्यात घेतले, याविरोधात इराणने संयुक्त राष्ट्राला पत्र लिहिले. अमेरिका आमच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असल्याचे त्यांनी त्यामध्येच म्हटले. अमेरिकेच्या या कारवाई त्यांनी विरोध केला. अजून एक जहाज इराणचे अमेरिकेने ताब्यात घेतल्याचे कळत आहे.

इराणच्या सरकारी टीव्ही अँकर्सनी आयआरजीसीच्या केंद्रीय मुख्यालय खतम अल-अंबियाचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फघारी यांचे निवेदन वाचतानाचा ऑडिओ आणि व्हिडिओ प्रसारित केला. वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांवर त्यांनी इशारा दिला. इस्लामिक इराणवर कोणतेही आक्रमण नाही तर कारवा झाल्यास इस्लामिक प्रजासत्ताकचे शस्त्र दल पूर्ण ताकदीने उत्तर देईल.

लहान मुलांची हत्या करणाऱ्या झायोनिस्ट राजवटीला इस्रायलला पूर्वी कधीही न शिकवलेला धडा शिकवेल, असेही त्यांनी म्हटले. इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थीसाठी बैठकांचे आयोजन केले जात असतानाच मध्य पूर्वेत स्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. दोन्ही देश आक्रमक भूमिकेत आहेत. अमेरिकेने नाकेबंदी काढली पाहिजे, या मागणीवर इराण ठाम आहे. त्यामध्येच इराणकडून आता संयुक्त राष्ट्राकडे धाव घेण्यात आली. यामध्ये संयुक्त राष्ट्र नक्की काय भूमिका घेतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल