AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran warns US : सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार..; अणुसंशोधन केंद्रांना लक्ष्य केल्यानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा

अमेरिकेनं इराणच्या नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो या अणुसंशोधन केंद्रांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे.

Iran warns US : सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार..; अणुसंशोधन केंद्रांना लक्ष्य केल्यानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा
Ruhollah KhomeiniImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 11:37 AM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने आता एक नवीन वळण घेतलं आहे. यात पहिल्यांदाच अमेरिकन सैन्याने थेट हस्तक्षेप करून इराणच्या तीन प्रमुख अणुसंशोधन केंद्रांवर हल्ले केले आहेत. इस्फहान, नतान्झ आणि फोर्डो याठिकाणी अमेरिकन सैन्यानं हल्ले केले. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे. सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करू.. असा थेट इशारा इराणने दिला आहे. इराणी माध्यमांनी अमेरिकेच्या या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अमेरिकन सैन्याने अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि ड्रोन वापरून अणुसंशोधन केंद्रांवर हल्ला केल्याची माहिती आहे. परंतु इराणी वृत्तवाहिन्यांनी असाही दावा केला की त्यांनी अमेरिकेच्या या हल्ल्यापूर्वी त्यांचे युरेनियम साठे दुसरीकडे हलवले होते. मार्च 2025 मध्येच इराणने त्यांचे संवेदनशील अणु उपकरणे सुरक्षित ठिकाणी पाठवण्याची योजना आखली होती. इराण आणि इस्रायच्या या संघर्षात अमेरिका इस्रायलला साथ देत आहे. इराणसारख्या इस्लामिक देशाला अणुबॉम्ब मिळवण्यापासून रोखणं हा दोघांचाही उद्देश आहे. जर इराण असं करण्यात यशस्वी झाला तर ते त्यांच्यासाठी अडचणीचं कारण बनेल, अशी त्यांना भीती आहे.

अमेरिकन सैन्याने इराणमधील इस्फहान, नतान्झ आणि फोर्टो या अणुसंशोधन केंद्रांवर हल्ला केल्याची माहिती व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दिली. या संदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. इतकंच नव्हे तर अमेरिकनं इराणला युद्ध थांबवण्यासाठी धमकीही दिल्याचं कळतंय. जर इराणने हा संघर्ष थांबवला नाही तर आम्ही पुन्हा हल्ला करू, असं अमेरिकेनं म्हटलंय.

दरम्यान अमेरिकेनं या संघर्षात सहभागी होऊ नये, असा इशारा इराणने शनिवारी दिला. “तसं झाल्यास ते अतिशय धोकादायक असेल”, असं इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची म्हणाले. त्यांनी शुक्रवारी जीनिव्हामध्ये युरोपीय महासंघाचे राजनैतिक अधिकारी आणि फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र त्यामधून कोणताही मार्ग निघू शकला नाही. तर दुसरीकडे इराणबरोबर सुरू असलेल्या लष्करी संघर्षात इस्रायलने त्या देशाच्या अणुसंशोधन केंद्रावर हल्ला केला आणि त्यांच्या तीन वरिष्ठ कमांडरना ठार केलं, अशी माहिती इस्रालयच्या लष्कराने दिली.

Follow Us
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप