AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump: मोठी अपडेट, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महासंकट! अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग चालणार?

Donald Trump Impeachment: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार का? अशी अमेरिकेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. इराणविरोधातील युद्धात अमेरिकेची नाचक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातूनच डेमोक्रॅट्स त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. तर रिपब्लिकन खासदारांचीही त्यांच्यावर नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.

Donald Trump: मोठी अपडेट, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महासंकट! अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग चालणार?
डोनाल्ड ट्रम्प महाभियोगImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 08, 2026 | 10:05 AM
Share

Donald Trump Impeachment: इराणविरोधातील युद्धाने अमेरिकेत एक मोठा गट डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आक्रमक झालेला आहे. युद्ध नको म्हणून कोट्यवधी नागरिक गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले होते. ट्रम्प यांच्या युद्ध खोर धोरणाविरोधात अमेरिकेत मोठे प्रदर्शन झाले. तर आता युद्धबंदी जाहीर केल्यानंतर डेमोक्रॅट्सच नाही तर रिपब्लिकन खासदारही ट्रम्प यांच्यावर तुटून पडले आहेत. जगात अमेरिकेची नाचक्की केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे. डेमोक्रॅटिक खासदारांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांना लक्ष्य केले आहे. हे खासदार लवकरच 25 व्या घटनादुरुस्ती आधारे ट्रम्पविरोधात महाभियोग आणणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी इराणची संस्कृती नष्ट करण्याची भाषा वापरली होती. अमेरिकेच्या पहिल्या नागरिकाला असे वक्तव्य शोभा देणारे नसल्याचे डेमोक्रॅटिक खासदारांनी म्हटले आहे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी योग्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महाभियोगाची टांगती तलवार

डेमोक्रॅटिक खासदारांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचे जाहीर केल्यानंतर लागलीच त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. वरिष्ठ सिनेटर, प्रतिनिधीगृहाचे काही सदस्य, महिला आणि पुरूष काँग्रेस सदस्य, माजी उपराष्ट्रपती आणि काही राज्यांच्या राज्यपालांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. तर रिपब्लिकन खासदारही ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि हडेलहप्पी स्वभावाने नाराज असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाने अमेरिकेत महागाई वाढवल्याचा दावा आता ट्रम्प यांच्या पक्षातूनही दबक्या आवाजात सुरू झाला आहे.

काँग्रेसच्या महिला सदस्य अलेक्झांड्रिया ओकासिओ यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. राष्ट्राध्यक्षांनी इराणी लोकांचा नरसंहार करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी त्याप्रमाणे हल्ले चढवले आहेत. ट्रम्प यांनी जगाला आणि अमेरिकेला धोक्यात घातले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाद्वारे असो वा काँग्रेसद्वारे राष्ट्राध्यक्षांना पदावरून हटवले जाणे अत्यंत गरजेचे असल्याचे ओकासिओ यांनी ट्विट केले आहे. आपण एका मोठ्या संकटाशी झुंजत असल्याचे त्या म्हणाल्या. आता या महाभियोगाचा कितपत परिणाम ट्रम्प यांच्यावर आणि त्यांच्या प्रशासनावर होतो हे लवकरच समोर येईल. पण रिपब्लिकन पक्षाने जर याविषयी वेगळी भूमिका घेतली तर ट्रम्प यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....