AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US Ceasefire: युद्धविराम होताच इराणने का मानले पाकिस्तानचे धन्यवाद? शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर ठरले देवदूत? भारताच्या हाती लागलं काय?

Iran-US Ceasefire: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल या देशात दोन आठवड्याचा युद्धविरामाची घोषणा झाली आहे. ही घोषणा होताच इराणने सर्वात आधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांचे धन्यवाद मानले. जागतिक मंचावर पाकिस्तानचे वजन वाढल्याचे हे द्योतक आहे. तर या सर्व कुटनीतीत भारताच्या हाती लागले काय? असा सवाल विचारला जात आहे.

Iran-US Ceasefire: युद्धविराम होताच इराणने का मानले पाकिस्तानचे धन्यवाद? शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर ठरले देवदूत? भारताच्या हाती लागलं काय?
Iran-US CeasefireImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 8:42 AM
Share

Iran-US Ceasefire: गेल्या एक महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धाला अखेर विराम मिळाला. दोन आठवडे मध्य-पूर्वेत युद्धविरामाची घोषणा झाली. युद्धविराम होताच इराणने सर्वात अगोदर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांचे आभार मानले. पाकिस्तान आतंतरराष्ट्रीय मंचावर वेळीच योग्य भूमिका घेण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी ट्वीट करत दोन्ही नेत्यांचे आभार मानले. तर भारताच्या हाती कुटनीतीत काय लागले असा सवाल विचारल्या जात आहे.

पाकिस्तानकडून दोन्ही गटांना शांततेचे आवाहन

अराघची यांनी ट्विटमध्ये पाकिस्तानच्या शांततेच्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कराचे फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी शांततेचा आणि बंधुभावाचा प्रस्ताव सादर केला होता. अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष थांबवून चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्या प्रस्तावाचा इराणने मान ठेवला. अमेरिकेने 15 मुद्दे असलेला प्रस्ताव दिला होता. तर इराणने 10 मुद्दे असलेला मसुदा सादर केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या प्रस्ताव स्वीकारल्याचे म्हटले जात आहे.

सर्वोच्च राष्ट्रीय परिषदेचा संदेश काय?

इराणची सर्वोच्च राष्ट्रीय परिषदेने अमेरिकेला स्पष्ट शब्दात सुनावले आहे. इराणवरील सर्व प्रकारचे हल्ले तात्काळ थांबवल्यास इराणकडूनही कोणतीच सशस्त्र कारवाई करण्यात येणार नाही असे आश्वासन देण्यात आले. या दरम्यान कोणतीह आगळीक केली तर त्याचे ठोस उत्तर देण्यात येईल असा इशारा देण्यात आला. शांतता राखण्याचे काम केवळ इराणचेच नाही तर दोन्ही पक्षाचे असल्याचेही राष्ट्रीय परिषदेने बजावले आहे. इराणचे लष्कर स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून सर्वच देशांच्या जहाजांच्या दळणवळणावर लक्ष ठेवणार आहे. इंधन पुरवठा करणाऱ्या जहाजांना संरक्षण देणार आहे. दोन आठवडे कोणतेची चुकीचे पाऊल टाकू नये असा आवाहन इराणकडून करण्यात आले आहे.

भारताच्या हाती लागले काय?

भारताने या युद्धात तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसते. भारताने दोन्ही देशांना वारंवार युद्ध थांबवण्याचे आणि चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले होते. भारताच्या कुटनीतीमुळे भारताच्या जहाजांना इराणने अटकाव केला नाही. भारतातील जनतेने इराणला आर्थिक मदत पाठवली. त्याचे आभार इराणने मानले आहे. पाकिस्तानला हे युद्ध थांबवणे गरजेचे होते. इराणचे प्रतिनिधी आणि अमेरिकन प्रतिनिधी येत्या शुक्रवारी इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी समोरासमोर असतील असे म्हटल्या जात आहे. कुटनीतीच्या स्तरावर पाकिस्तानने मोठी मजल मारल्याचा दावा करण्यात येत आहे.

Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....