AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘डबल गेम’, एकीकडे इराणसोबत चर्चेचा प्रस्ताव, दुसरीकडे उचललं मोठं पाऊल, तब्बल 10 हजार

US troops deployment Middle East : इराण-इस्रायल-अमेरिका युद्ध निर्णायक टप्प्यावर आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले थांबवण्यासाठी मुदत दिली, पण 10 हजार सैनिकही पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल गेम', एकीकडे इराणसोबत चर्चेचा प्रस्ताव, दुसरीकडे उचललं मोठं पाऊल, तब्बल 10 हजार
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Mar 27, 2026 | 9:07 AM
Share

इराण आणि इस्रायल-अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धाला जवळपास 1 महीना होत आला असून आता हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणच्या उर्जा प्रकल्पांवर आणि तेल सुविधांवर 10 दिवस हल्ले होणार नाही, अशी मुदत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. मात्र एकीकडे चर्चेचा प्रस्ताव देतानाच दुसरीकडे ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत आणखी 10 हजार सैनिक पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, पेंटागॉन मध्य-पूर्वेत 10 हजारापर्यंत अतिरिक्त भूदल पाठवण्याची योजना आखत आहे. एकीकडे शांततेसाठी इराणसोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प यांना अधिक लष्करी पर्याय उपलब्ध होणार आहेत. .

गेल्या महिन्यात, म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केला, तेव्हा व्यापक वाटाघाटी अजूनही सुरू होत्या. मात्र, या वाटाघाटी मध्यात असतानाच, इराणवर हल्ला झाला आणि सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासह 40 वरिष्ठ कमांडर मारले गेले. यामुळे नव्या युद्धाला तोंड फुटलं.

अमेरिकेकडून इराणविरुद्ध ड्रोन स्पीडबोट्स तैनात

इराणविरुद्धच्या कारवाईत अमेरिकेने ‘ब्लॅकसी’ कंपनीने बनवलेल्या GARC ड्रोन बोटी तैनात केल्या आहेत, असं पेंटागॉनने प्रथमच कबूल केलं आहे. सध्या सुरू असलेल्या संघर्षात अशा बोटींच्या वापराची अमेरिकेने पुष्टी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाळत ठेवण्यासाठी या बोटींचा वापर प्रामुख्याने केला जात असून गरज पडल्यास त्या हल्ले करण्यासाठीही सक्षम आहेत. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकन नौदल अशा मानवरहित बोटी बनवण्याचा प्रयत्नात आहे, मात्र त्यांन अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

युक्रेन-रशिया युद्धादरम्यान रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटचं, नौदलाचं मोठं नुकसान केल्यानंतर अशा ड्रोन बोटींना विशेष महत्त्व प्राप्त झालं. इराणनेही गेल्या महिन्यात आखातातील तेलवाहू जहाजांवर दोन सागरी ड्रोन हल्ले केले होते.

दरम्यान इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्याची मुदत 10 दिवसांनी वाढवून ट्रम्प यांनी ती 6 एप्रिलपर्यंत केली होती. मात्र या काळात इराणने अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांचे पॉवर प्लांट्स पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल