AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : युद्ध सुरू असतानाच मोठी अपडेट, ट्रम्पवर वाढला दबाव, कोणी पाठवला सीक्रेट मेसेज ?

आखाती मित्रराष्ट्रे (सौदी, यूएई) इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू ठेवण्यासाठी ट्रम्प प्रशासनावर दबाव टाकत आहेत. तेहरानची राजवट बदलण्याची ही ऐतिहासिक संधी असून, महिनाभर हवाई हल्ले होऊनही ती पूर्णपणे खिळखिळी झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 32 दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तरीही युएई सारखे देश भूदल हल्ल्याची मागणी करत आहेत.

Iran-Israel War : युद्ध सुरू असतानाच मोठी अपडेट, ट्रम्पवर वाढला दबाव, कोणी पाठवला सीक्रेट मेसेज ?
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Mar 31, 2026 | 10:48 AM
Share

इराण वि. इस्रायल-अमेरिका संघर्ष शीगेला पोहोचला असून 32 व्या दिवशीही युद्धाचे ढग कायम आहेत. याचदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या आखाती मित्र राष्ट्रांनी, इराणविरुद्धचे युद्ध सुरू ठेवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकी आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, आखाती देशांचा असा दावा आहे की महिनाभर हवाई हल्ले होऊनही तेहरानची धार्मिक राजवट अद्याप पूर्णपणे खिळखिळी झालेली नाही. युद्धाच्या सुरुवातीला पुरेशी माहिती न मिळाल्याने हे देश तसंतापले होते, मात्र ( हे युद्ध ) म्हणजेआता तेहरानचे नेतृत्व कायमस्वरूपी मोडून काढण्याची एक ऐतिहासिक संधी अशा दृष्टीने ते त्याकडे पहात आहेत. त्यामुळेच जोपर्यंत इराणी नेतृत्वात मोठा बदल होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाया थांबवू नका, असा मेसेज सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत आणि बहरीन यांनी पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

युद्ध अजून सुरू ठेवायचं की तोडगा काढायचा या द्विधा मनःस्थितीत ट्रम्प स्वतः आहेत, मात्र त्यावेळीच ही मागणी आली आहे. गेल्या 32 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत 3 हजारांहून हून अधिक लोक मारले गेले आहेत.

ट्रम्प यांचं म्हणणं काय ?

रविवारी संध्याकाळी एअर फोर्स वनमधून ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. “सौदी अरेबिया जोरदार प्रत्युत्तर देत आहे. कतार प्रत्युत्तर देतंय, यूएई पलटवार करतोय. कुवेत , बहरीनही प्रत्युत्तर देत आहे ” असं त्यांनी सांगितलं.

आखाती देशांमध्ये अमेरिकी सैन्य आणि तळ आहेत, जिथून अमेरिकेने इराणवर हल्ले केले आहेत, मात्र या देशांनी स्वतः या हल्ल्यांमध्ये सहभाग घेतलेला नाही. आखाती मित्रराष्ट्र ही कमी-अधिक प्रमाणात युद्धाला पाठिंबा देतात. मात्र, प्रादेशिक नेते आता अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत. एका आखाती राजदूताने सांगितले की या मुद्द्यावर काही मतभेद आहेत, आणि सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती तेहरानवर वाढीव लष्करी दबाव आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत असं वृत्त एपीने दिलं होतं.

संयुक्त अरब अमिरात (UAE) हा आखाती देशांमध्ये कदाचित सर्वात आक्रमक देश म्हणून उदयास आला आहे आणि तो ट्रम्प यांच्यावर जमिनीवरील आक्रमणाचा आदेश देण्यासाठी दबाव आणत आहे, असंही राजदूतंनी नमूद केलं. कुवेत आणि बहरीन देखील या पर्यायाला पाठिंबा देत आहेत. इराणद्वारे डागण्यात आलेल्या 2300 हून अधिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा सामना करणाऱ्या UAE मध्ये, युद्ध लांबत चालल्याने वाढता संताप दिसून येत आहे. या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील व्यापार आणि पर्यटनासाठी एक सुरक्षित आणि समृद्ध केंद्र म्हणून असलेल्या त्याच्या प्रतिमेला डाग लागण्याचा धोका आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा