AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US War: अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तानची एंट्री; इस्लामाबादमध्ये होणार शांती वार्ता? अपडेट काय?

Iran-US War Peace Talk: इराण यु्द्धाने अवघ्या जगाला वेठीस धरले. जगात ऊर्जा संकट निर्माण झाले. जवळपास 22 देशांनी दबाव वाढवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पाऊल मागे घेतले. सकारात्मक चर्चेचा हवाला देत त्यांनी इराणवरील हल्ले थांबवले. तर आता अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तानची एंट्री झाली आहे. पाक शांतीदूत ठरणार का?

Iran-US War: अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तानची एंट्री; इस्लामाबादमध्ये होणार शांती वार्ता? अपडेट काय?
पाकिस्तान होणार शांतीदूत?
| Updated on: Mar 24, 2026 | 10:22 AM
Share

Iran-US War Peace Talk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले पाच दिवसांसाठी थांबवण्याची जाहीर केले. त्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, इस्त्रायल आणि पाकिस्तानचे अधिकारी या दोन्ही देशांना इस्लामाबाद येथे एका टेबलवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका आणि इराणचे वरिष्ठ प्रतिनिधी या बैठकीत असतील. या युद्धात पाकिस्तान शांतीदूत ठरू पाहत आहेत. त्यामुळे अनेक राजकीय तज्ज्ञ आणि कुटनीतीज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. यामाध्यमातून जागतिक राजकारणात पाक स्वत:चे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोण येणार इस्लामाबादमध्ये?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वांस, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि माजी सल्लागार आणि ट्रम्प यांचे जावाई जेयर्ड कुशनर हे नेते इस्लामाबादमध्ये येऊ शकतात. इराणकडून या बैठकीसाठी कोण येणार याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. तर इस्त्रायलचे अधिकारी, तुर्की आणि इजिप्तचे वरिष्ठ नेते लवकरच पाकिस्तानमध्ये येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध सुरू असताना पाकची कुटनीती चर्चेचा विषय ठरली आहे.

पाक शांतीदूत ठरणार?

या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पजेश्कियन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी इराणला इस्लामाबाद येथे बैठकीस आमंत्रित केले. यापूर्वी सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा वार्तालाप झाल्याची माहिती येत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी सुद्धा इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात पुढील आठवड्यात शांतीवार्ता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर व्हाईट हाऊसने याविषयीची कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कॅरोलिन लेव्हिट यांनी हा संवेदनशील मुद्दा असून जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत त्यावर बोलण्यास नकार दिला. तर दुसरीकडे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाप यांनी हा या सर्व बातम्या खोट्या असल्याचा दावा केला. जागतिक बाजाराला प्रभावित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.  तर दुसरीकडे पाकिस्तान शांतीदूत होण्यासाठी आतूर असल्याचे समोर आले आहे.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी