जुम्म्याच्या दिवशीच जगातील सर्वात बडा मुस्लिम नेता भडकला, थेट अमेरिकेवर हल्ल्याचा इशारा, युद्ध पेटणार?
War : जगात आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. कारण आता जगातील एका बड्या मुस्लिम नेत्याने थेट अमेरिकेवर हल्ला करण्याची भाषा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गेल्या काही महिन्यांपासून जगातील अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहे. इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध झाले होते. तर अमेरिकेनेही व्हेनेझुएलावर हल्ला करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना कैद केले असून व्हेनेझुएलावर आता अमेरिकेची सत्ता असणार आहे. चीन आणि तैवान यांच्यातील संघर्षही जगाचे लक्ष वेधत आहे. अशातच आता जगात आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. कारण आता जगातील एका बड्या मुस्लिम नेत्याने थेट अमेरिकेवर हल्ला करण्याची भाषा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अली खामेनी यांचा अमेरिकेला इशारा
गेल्या काही काळापासून इराणमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांवा नियंत्रित करण्यासाठी इराणी सरकारने बळाचा वापर केला, यात काही आंदोलकांचा मृत्यू झाला होता. यावरून अमेरिकेने आंदोलकांवर होणारे हल्ले रोखा अन्यथा अमेरिकन सैन्य इराणमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे असा इशारा दिला होता. यानंतर आता इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा दिला आहे. जुम्म्याच्या नमाजानंतर खामेनी म्हणाले की, ‘आम्ही अमेरिकेसमोर झुकणार नाही. आम्ही आमच्या सीमा कधीही विसरत नाही, परंतु जर कोणी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल.’ याचाच अर्थ इराणने अमेरिकेला थेट धमकी दिली आहे.
अयातुल्ला अली खामेनी यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘इस्रायल आणि अमेरिका कट रचत आहेत, मात्र त्यांचा कट यशस्वी होणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या देशावर लक्ष केंद्रित करावे. त्यांच्या दबावाखाली इराण मागे हटणार नाही. इराण एक सार्वभौम राष्ट्र आहे. जर कोणाला हा गैरसमज असेल तर त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करावा. त्यांना जशास तसं उत्तर दिले जाईल.’
खामेनी इराण सोडणार, ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मोठं विधान केलं होतं. ट्रम्प यांनी म्हटले होते की, ‘गेल्या वर्षी इराणचे अणुप्रकल्प नष्ट करून आम्ही शांततेचा प्रश्न सोडवला होता. आता खामेनी इराण सोडण्याची तयारी करत आहेत. आम्ही इराणी सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे आंदोलकांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. वेळ आल्यास आम्ही इराणमध्ये प्रवेश करू शकतो.’
