AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran vs israel : इस्रायलसाठी अमेरिका मैदानात, इराणचं टेन्शन वाढवणारी बातमी

इराणच्या हल्ल्याबाबत इस्रायल अलर्ट आहे. इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी इराणने दिली आहे. त्यामुळे हा हल्ला कधीही होऊ शकतो. त्यामुळे आता अमेरिकेने देखील मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने इराणला खुला इशारा दिल आहे. अमेरिकेनेही इस्त्रायलला कोणत्याही परिस्थितीत संरक्षण देणार असल्याचे म्हटले आहे.

Iran vs israel : इस्रायलसाठी अमेरिका मैदानात, इराणचं टेन्शन वाढवणारी बातमी
| Updated on: Nov 02, 2024 | 4:04 PM
Share

Israel vs Iran : इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे अमेरिकेने आता मोठा निर्णय़ घेतला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्धासारखी परिस्थिती आहे. दोन्ही देश माघार घ्यायला तयार नाहीत. हमास आणि हिजबुल्लाहच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान इस्रायलला आता इराणच्या हल्ल्याचाही सामना करावा लागतो आहे. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी अमेरिका भक्कमपणे त्याच्या पाठिमागे उभा आहे. एकेकाळी एकमेकांचे मित्र असलेले हे देश आज एकमेकांच्या विऱोधात उभे आहेत. यामागची कारणे बरीच आहेत. पण तणाव वाढला असताना आता अमेरिकेने बॉम्बर विमाने, लढाऊ विमाने आणि नौदलाची विमाने पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी मेजर जनरल पॅट रायडर यांनी ही माहिती दिलीये.

अमेरिकेने तैनात केले लढाऊ विमाने

1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर 180 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर 25 दिवसांनी इस्रायलने इराणच्या लष्करी तळांवर लढाऊ विमान पाठवून हल्ला केला. आता इराणने पुन्हा एकदा इस्रायलला प्रत्युत्तराला उत्तर देण्यासाठी हल्ल्याची तयारी केली आहे. यामुळेच अमेरिकेने मध्यपूर्वेत अधिक विमाने तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेने B-52 बॉम्बर, लढाऊ विमाने, टँकर विमाने आणि नौदल विनाशक या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. ही विमाने पश्चिम आशियामध्ये लवकरच पोहोचतील. दुसरीकडे, यूएसएस अब्राहम लिंकन युद्धनौका अमेरिकेत परतणार आहे. यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू नौका आणि त्याच्या स्ट्राइक ग्रुपमधील तीन विनाशक लवकरच सॅन दिएगो बंदरावर पोहोचतील.

अमेरिकेचा इराणला इशारा

कोणत्याही परिस्थितीत इस्रायलचे संरक्षण करणार असल्याचे अमेरिकेने आधीच म्हटले आहे. 1 ऑक्टोबर रोजी इराणने जो हल्ला केला होता तो निष्फळ करण्यासाठी अमेरिकेने देखील इस्रायलला मोठी मदत केली होती. इस्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. इस्रायलने आमचा बदला पूर्ण झाला असल्याचं म्हटले होते. आता जर पुन्हा इराणने हल्ला केला तर त्याला वाईट परिणाम भोगावे लागतील असेही इस्रायलने इशारा देत म्हटले होते. त्यामुळे इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची चूक करू नये, असे अमेरिकेने म्हटले आहे.

इराण लष्करी तळाचे इस्रायलने हल्ले करत मोठे नुकसान केले आहे. या तळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जात होती. तो तळच इस्रायलने नष्ट केला आहे. अमेरिकेटचे प्रेस सेक्रेटरी मेजर जनरल पॅट रायडर म्हणाले की, जर इराण किंवा त्याचे प्रॉक्सी हे अमेरिकन कर्मचारी किंवा हितसंबंधांना लक्ष्य करत असतील तर युनायटेड स्टेट्स आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.

दुसऱ्यांदा B-52 विमाने तैनात

एका महिन्यात अमेरिकेने दुसऱ्यांदा B-52 बॉम्बर मध्यपूर्वेत तैनात केले आहेत. हे अण्वस्त्र सक्षम विमान आहे. अमेरिकेने याच महिन्यात येमेनमधील हुथी बंडखोरांवरही याच विमानाने हल्ला केला होता. सध्या येथे ४३ हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आता बॉम्बर विमाने तैनात केल्यामुळे अमेरिकेची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.