AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इस्रायलचा पुन्हा हवाई हल्ला, 33 जणांचा मृत्यू

इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या इमारतींचे नुकसान झाले आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांमुळे 33 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! इस्रायलचा पुन्हा हवाई हल्ला, 33 जणांचा मृत्यू
gaza israel news
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 06, 2025 | 9:04 PM
Share

गेल्या दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरु आहे. आता गाझा पट्टीतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पुन्हा एकदा इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या इमारतींचे नुकसान झाले आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांमुळे 33 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

इस्रायली सैन्याने या हल्ल्याबाबत बोलताना म्हटले की, काल एका दिवसात गाझामधील 100 हून अधिक ठिकाणांवर हल्ला केला आहे. यात मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू युद्धबंदीच्या चर्चेसाठी अमेरिकेला जाणार आहेत. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला आहे. डोनाल्ट ट्रम्प हे या युद्धबंदी साठी प्रयत्न करत आहेत. 21 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होणार आहे.

गाझा शहरातील दोन घरांवर निशाणा

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात मोठे नुकसान झाले आहे. गाझा शहरातील शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेल्मिया यांनी सांगितले की, इस्रायली हल्ल्यांमध्ये गाझा शहरातील दोन घरांवर निशाणा साधण्यात आला. यात 20 लोक ठार झाले आणि 25 जण जखमी झाले आहेत. तसेच नासिर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मुवासी भागात झालेल्या हल्ल्यात 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

24 तासांत 130 ठिकाणी हल्ला

इस्रायली सैन्याने गेल्या 24 तासांत गाझा पट्टीतील 130 ठिकाणी हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यांमध्ये हमासच्या कमांड अँड कंट्रोल स्ट्रक्चर्स, स्टोरेज सेंटर्स आणि शस्त्रास्त्रांना लक्ष्य करण्यात आले. तसेच उत्तर गाझामधील अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 47 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. लोक जेवण घेण्यासाठी रांगेत उभे असताना हे हल्ले झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल