AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Iran Tension : बदल्याची भाषा, उड्डाण रद्द, अलर्टवर सौदी-UAE….आता पुढे काय होणार?

Israel-Iran Tension : मध्य पूर्वेमध्ये तणावाची स्थिती आहे. बदला घेण्याची धमकी देण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय विमान कंपनीने उड्डाण रद्द केली आहेत. आखातामधील देश अलर्टवर आहेत. मोहम्मद रजा जाहेदी याच्या अंत्यसंस्कारावेळी एअर स्ट्राइकचा बदला घेण्याची धमकी देण्यात आली होती.

Israel-Iran Tension : बदल्याची भाषा, उड्डाण रद्द, अलर्टवर सौदी-UAE....आता पुढे काय होणार?
benjamin netanyahu-khomeini
| Updated on: Apr 11, 2024 | 10:56 AM
Share

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने सीरियामधील इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला. यात इराणचे 2 कमांडर आणि 7 अन्य व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने बदला घेण्याची घोषणा केली. इराणच्या या इशाऱ्यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईने अनेक देश धस्तावले आहेत. या धमकीच्या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या एअर लाइन्सने तेहरानसाठीची आपली सर्व उड्डाण रद्द केली आहेत. इराणने इस्रायलच्या एअर स्ट्राइक नंतर बदला घेण्याची धमकी दिलीय. त्यानंतर मिडिल ईस्टच्या सर्वच देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. ही स्थिती लक्षात घेऊन, जर्मनीच्या लुफ्थांसा एअरलाइन्सने तेहरानहून येणारी आणि तिथे जाणारी सर्व उ्डडाण रद्द केली आहेत. प्रवाशी आणि स्टाफची सुरक्षा सर्वोच्च आहे, असं एअर लाइन्सने या निर्णयाबद्दल सांगितलं. 6 एप्रिलपासून 11 एप्रिल पर्यंत सर्व उड्डाण रद्द केली आहेत.

इराणच्या न्यूज एजन्सीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक अरेबिक रिपोर्ट जारी केला, त्यानंतर हा तणाव आणखी वाढला. तेहरानच्या सर्व हवाई क्षेत्राला मिलिट्री ड्रीलसाठी बंद केलय, असं त्यात लिहिल होतं. एजन्सीने नंतर ती पोस्ट सुद्धा डिलीट केली. मिडिल ईस्ट शिवाय अमेरिकेनेही इराणच्या संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन हाय अलर्ट जारी केलाय. मिडिल ईस्टच्या स्थितीवर सतत लक्ष ठेऊन आहोत, असं लुफ्थांसा एअरलाइन्सने सांगितलं. लुफ्थांसा एअरलाइन्स आणि ऑस्ट्रियन एयरलाइन्स या दोनच हवाई कंपन्या तेहरानमधून आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सच संचालन करतात.

काय धमकी दिलीय?

1 एप्रिलला सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये इस्रायलने इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला. यात 14 लोकांचा मृत्यू झाला. यात 7 सामन्य नागरिक होते. 2 इराणी कमांडर होते. इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सच्या परदेश विभागाचा प्रमुख कुद्स फोर्सचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद रजा जाहेदी ठार झाला. इराणचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल मोहम्मद बघेरी यांनी मोहम्मद रजा जाहेदीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी बदला घेण्याची भाषा केली होती. आम्हाला बदला घ्यायचा आहे आणि बदला घेणार असं ते म्हणालेले. बदला कधी आणि कसा घ्यायचा? हे इराण ठरवेल, मोहम्मद बघेरी म्हणाले होते.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान