Israel attack on Iran: इस्रायलच्या अचूक हल्ला, इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र युनिट उद्ध्वस्त, आता अमेरिकेनेही दिली धमकी

israel attack iran: इस्रायलीमधील सूत्रांनी सांगितले की, इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी वापरण्यात येणार घन इंधन तयार करण्यासाठी वापरलेले युनिट नष्ट केले आहे. इराणच्या क्षेपणास्त्र शस्त्रागाराचा हा मोठा भाग होता.

Israel attack on Iran: इस्रायलच्या अचूक हल्ला, इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र युनिट उद्ध्वस्त, आता अमेरिकेनेही दिली धमकी
israel destroys iran missile production
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 4:25 PM

Israel Destroy Iran Missile Production: इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर हल्ला केला होता. त्या हल्ल्याचा बदला इस्त्रायलने शनिवारी घेतला. इस्त्रायलने शनिवारी इराणावर जोरदार हल्ले केले. इस्त्रायलने या हल्ल्यात इराणाचे लष्करी तळांना लक्ष केले होते. इस्त्रायलचा हा अचूक ठरला. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र युनिट उद्ध्वस्त झाले आहे.इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे क्षेपणास्त्र उत्पादन युनिट पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे इराणसाठी हा मोठा धक्का आहे.

हल्ले अचूक होते…

इस्रायलीमधील सूत्रांनी सांगितले की, इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी वापरण्यात येणार घन इंधन तयार करण्यासाठी वापरलेले युनिट नष्ट केले आहे. इराणच्या क्षेपणास्त्र शस्त्रागाराचा हा मोठा भाग होता. हे मिक्सर अतिशय प्रगत आहे. ते इराण स्वतः बनवत नाहीत. ते चीनकडून खरेदी केली जातात. इराणने गेल्या काही वर्षांत मोठ्या किमतीत अनेक मिक्सर आयात केले आहेत. आता इस्रायलने सांगितले की त्यांचे हल्ले अचूक होते आणि त्याचे उद्दिष्ट साध्य झाले.

इस्त्रायलच्या हल्ल्यात मोठे नुकसान

इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या क्षेपणास्त्र उपक्रमाचे मोठे नुकसान झाले आहे. इस्त्रायली हल्ल्यामुळे इराणची क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता नष्ट झाल्याची पुष्टी एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने दिली आहे. इस्त्रायलने हल्ल्यात इराणमधील लष्करी तळांना लक्ष केले. पॉवर प्लँटवर उद्ध्वस्थ केले. तसेच ऑईल रिफायनरीवर हल्ले केले. ही सर्व हल्ले केल्यानंतर इस्त्रायलची विमाने सुरक्षितपणे परतल्याचे इस्त्रायलच्या प्रवक्ताने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

इराणने हल्ला केला तर…

शनिवारी झालेल्या हल्ल्यादरम्यान केवळ इस्रायलच नाही तर अमेरिकेनेही इराणला धमकी दिली आहे. इस्त्रायलने म्हटले आहे की, इराणने प्रत्युत्तर दिल्यास आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. दुसरीकडे अमेरिकेने म्हटले आहे की, आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. परंतु इराणने हल्ला केला तर अमेरिका इस्त्रायलची मदत करणार आहे.

इराणवरील हल्ल्यांबाबत इस्त्रायल परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी कोबी शोशानी म्हणाले की, आम्ही संदेश अगदी स्पष्ट दिला आहे. आमच्याशी पंगा घेऊ नका. आम्ही कुठेही अचूक लक्ष्य करू शकते. मध्यपूर्वेत शांतता राखणे हा आमचा उद्देश आहे.

मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.