Explained : इराणने किती टक्के शुद्ध युरेनियम बनवलेलं? त्यापासून ते किती अणूबॉम्ब बनवू शकत होते? म्हणून हा हल्ला
Israel Attack Iran : इस्रायलने इराणच्या अण्विक तळांवर हल्ला केला, त्यामागे काही कारणं आहेत. एक रिपोर्ट या हल्ल्याला कारण ठरलय. अणूबॉम्ब बनवण्याची एक प्रोसेस असते. त्यामध्ये इराणने एक टप्पा गाठलेला. सेंट्रीफ्यूज केलेले अनेक प्लान्ट इराणने एक्टिवेट केलेले. ही सगळी प्रोसेस काय आहे? नेमका हा हल्ला का झाला? समजून घ्या.

इस्रायल आणि इराणमधील तणावाने पुन्हा एकदा टोक गाठलं आहे. शुक्रवारी इस्रायलने इराणच्या अणवस्त्र आणि सैन्य ठिकाणांवर प्री-एम्पटिव (म्हणजे सुरक्षेसाठी आधीच केलेली कारवाई) हल्ला केला. या हल्ल्यात इराणची दीर्घ पल्ल्याची मिसाइल क्षमता आणि अणवस्त्र कार्यक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. Iranwatch.org नुसार, इराणकडे अणूबॉम्ब असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. दुसरीकडे इराणने सेंट्रीफ्यूज केलेले अनेक प्लांट पुन्हा एक्टिवेट केले आहेत. हे गॅस सेंट्रीफ्यूज अणवस्त्र शस्त्राचा मुख्य आधार असतो.
गॅस सेंट्रीफ्यूज यूरेनियम हेक्साफ्लोराइड गॅस (UF6) ला फिरवून अणवस्त्र इंधनासाठीच्या यूरेनियम प्रकाराला वेगळं करतो. या प्रक्रियेला यूरेनियम संवर्धन म्हटलं जातं. अलीकडच्या काही वर्षात इराणने सेंट्रीफ्यूज मॉडल विकसित आणि तैनात केले आहेत. जे IR-1 डिजाइनच्या तुलनेत कमी मशीन्समध्ये अधिक प्रमाणात युरेनियम समृद्ध करु शकतात.
इराणकडे किती टक्के शुद्ध युरेनियम होतं?
IAEA (आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा एजन्सी) चा एक रिपोर्ट आलेला. त्यात म्हटलेलं की, इराणने तपासात सहकार्य केलं नाही. त्या रिपोर्टनुसार इराणकडे जवळपास 60 टक्के शुद्ध युरेनियम आहे. अणवस्त्र विकसित करण्यासाठी इतर युरेनियम पुरेस आहे. 60 टक्के शुद्ध युरेनियमपासून जवळपास 9 अणूबॉम्ब बनवले जाऊ शकतात.
इस्रायलकडे किती अणूबॉम्ब आहेत?
इस्रायलने आतापर्यंत कधी हे मान्य केलं नाही की, त्यांच्याकडे अणवस्त्र आहेत. पण जागतिक सुरक्षा एजन्सी आणि तज्ज्ञांनुसार इस्रायलकडे जवळपास 90 अणूबॉम्ब आहेत. इस्रायलकडे हे अणूबॉम्ब लॉन्च करण्यासाठी मिसाइल, पाणबुड्या आणि फायटर जेट्स सुद्धा आहेत.
इराण अणवस्त्र तंज्ञनात कुठे?
इराण अणवस्त्र तंज्ञनाच्या बाबतीत बराच मागे आहे. इराण गपचूपपणे अणवस्त्र विकसित करत असल्याचा आरोप अमेरिका आणि इराणकडून केला जातो. इराणकडे अणवस्त्र असल्याची अजूनपर्यंत कोणतीही पक्की माहिती नाही.
बेंजामिन नेतन्याहू काय म्हणाले?
“इस्रायलच्या अस्तित्वाला इराणपासून निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी हे एक टार्गेटेड सैन्य ऑपरेशन आहे. हा फक्त एक हल्ला नाही, पुढे सुद्धा असे हल्ले होऊ शकतात. हा धोका संपवण्यासाठी जितके दिवस लागतील, तितका काळ हे ऑपरेशन सुरु राहिलं” असं बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
इराणकडे किती अणूबॉम्ब बनवण्याची क्षमता होती?
“अणवस्त्र विकसित करण्यासह नरसंहाराच्या वक्तव्याच समर्थन केलय. अलीकडच्या वर्षात इराणने नऊ अणूबॉम्ब विकसित करण्यासाठी उच्चप्रतीच युरेनियम उत्पादन केलं होतं. अलीकडच्या काही महिन्यात इराणने अशी पावलं उचलली की, जी याआधी त्यांनी कधी उचलली नव्हती. युरेनियम संवर्धन हे अणूबॉम्ब बनवण्याच्या दिशेने एक पाऊल होतं” असं बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.