AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Iran War : जगातील सर्वात मोठ्या गॅस फील्डवर इस्रायलचा हल्ला, इराणमध्ये एनर्जी संकट ? जगावर परिणाम काय ?

Israel Iran War: इस्रायलने इराणच्या जगातील सर्वात मोठ्या गॅस फील्ड साउथ पार्सचा(South Pars) एक महत्त्वाचा भाग असलेल्या फेज 14 वर हवाई हल्ला केला आहे. ऑफशोअर साइटच्या या टप्प्यावर झालेल्या हल्ल्यामुळे, इराणला सुमारे 12 मिलियन क्यूबिक मीटरे गॅसचे उत्पादन थांबवावे लागले. इस्रायलच्या या हल्ल्यामुळे जगाच्या ऊर्जा पुरवठ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Israel Iran War : जगातील सर्वात मोठ्या गॅस फील्डवर इस्रायलचा हल्ला, इराणमध्ये एनर्जी संकट ? जगावर परिणाम काय ?
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 16, 2025 | 9:55 AM
Share

Israel Iran War : गेल्या आठवड्यापासून ईराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेला तणाव आता अतिशय धोकादायक वळणावर पोहोचला आहे. यावेळी इस्रायलने थेट इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केलंय. इस्रायलने इराणच्या जगातील सर्वात मोठ्या गॅस फील्ड साउथ पार्सचा(South Pars) एक महत्त्वाचा भाग असलेल्या फेज 14 वर हवाई हल्ला केल्यामुळे तिथे मोठी आग लागली आणि काही काळासाठी गॅस प्रॉडक्शन थांबवावं लागलं. ऑफशोअर साइटच्या या टप्प्यावर झालेल्या हल्ल्यामुळे, इराणला सुमारे 12 मिलियन क्यूबिक मीटरे गॅसचे उत्पादन थांबवावे लागले. इस्रायलच्या या हल्ल्यामुळे जगाच्या ऊर्जा पुरवठ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नेमकं काय झालं ते जाणून घेऊया..

साउथ पार्स (South Pars) गॅस फील्ड आहे तरी काय ?

साउथ पार्स गॅस फील्ड हा इराणच्या बुशेहर प्रांतात आहे. हे गॅस फील्ड कतारसोबत शेअर केले आहे, जे नॉर्थ फील्ड म्हणून ओळखल जातं. हा प्रदेश जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा आहे. इराणच्या घरगुती गॅसच्या गरजांपैकी सुमारे 66 टक्के हिस्सा येथून येतो, ज्यातून देशातील वीज, हीटिंग आणि पेट्रोकेमिकल उत्पादने पुरवली जातात.

अमेरिका आणि रशियानंतर इराण हा जगातील तिसरा सर्वात मोठा गॅस उत्पादक देश आहे. तो दरवर्षी सुमारे 275 बिलिअन क्यूबिक मीटर (bcm) गॅसचे उत्पादन करतो, हे जागतिक उत्पादनाच्या सुमारे 6.5 टक्के इतकं आहे. मात्र, निर्बंधांमुळे, इराण हा बहुतेक गॅस देशांतर्गतच वापरतो, तर थोड्या प्रमाणात गॅस इराकसारख्या देशांमध्ये निर्यात केला जातो. याउलट, कतार हा दरवर्षी या प्रदेशातून युरोप आणि आशियामध्ये 77 दशलक्ष टन एलएनजी (LNG – Liquefied Natural Gas) वायू) निर्यात करतो. शेल आणि एक्सॉन मोबिल सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या या कामात त्याला मदत करतात.

हा हल्ला इतका मोठा का ?

खरं तर, इस्रायलने आत्तापर्यंत फक्त इराणच्या अणु आणि लष्करी तळांना लक्ष्य केलं होतं. पण यावेळी थेट ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला झाला आहे, हा हल्ला एका नवीन प्रकारच्या आर्थिक युद्धाकडे इशारा करत आहे. विशेष म्हणजे ऊर्जा तज्ज्ञ जॉर्ज लिऑन यांच्या मते, 2019 मध्ये सौदी अरेबियातील अबकाईक तेल सुविधेवर झालेल्या हल्ल्यानंतर हा हल्ला सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे.

जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरही संकट

साउथ पार्स गॅस फील्ड हे जिथे आहे, तो भाग जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे क्षेत्र केवळ कतारसाठीच महत्त्वाचे नसून, खार्ग बेट (इराणचे प्रमुख तेल निर्यात टर्मिनल) आणि होर्मुझची सामुद्रधुनी, हेसुद्धा आता धोक्यात आहेत. दररोज सुमारे 21 टक्के एलएनजी आणि 1.4 कोटी बॅरल कच्चे तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते.

बाजारावरही परिणाम

इस्रायलने केलेल्या या हल्ल्याच्या बातमीनंतर, तेलाच्या किमती 14 टक्क्यांनी वाढल्या असून प्रति बॅरल सुमारे 73 डॉलरवर (सुमारे 7000 रुपये) पर्यंत पोहोचल्या. साउथ पार्स गॅसचा वापर जरी प्रामुख्याने इराणमध्ये केला जात असला तरी, त्याचे धोरणात्मक महत्व खूप आहे. येत्या काळात खार्ग बेटावर किंवा होर्मुझच्या सामुद्रधुनीत काही अशांतता निर्माण झाली तर तेल आणि वायूच्या किमती गगनाला भिडू शकतात हेच OPECच्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या उत्पादक देशावर (इराण) हल्ला झाल्याचे संकेत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.